जून महिन्यात यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे अफगानिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलेला भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी अखेर यो-यो टेस्ट पास झाला आहे.
याची माहिती स्वत: मोहम्मद शमीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत दिली आहे.
“माझे ट्रेनिंग आणि फिटनेस पुर्ण करुन मी दिल्लीला रवाना होतोय. यो यो टेस्ट पास झाल्याचा आनंद होतोय. लवकरच भेटू”. असे आपल्या ट्विटमध्ये शमीने लिहले आहे.
मोहम्मद शमी ही यो यो टेस्ट पास झाल्यामुळे भारताच्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या संघ निवडीसाठी उपलब्ध असणार आहे.
Flying to Delhi after training and fitness session and very happy to done my yo yo test see u soon ..@circleofcricket @DelhiDaredevils @ESPNcricinfo @BCCI @ pic.twitter.com/3T5hPrYrvE
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) July 6, 2018
जूनमध्ये अफगानिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामना आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची यो यो टेस्ट घेण्यात आली होती.
मोहम्मद शमी, अंबाती रायुडू आणि भारतीय अ संघाचा संजू सॅमसन यो-यो टेस्ट फेल झाले होते.
त्यामुळे मोहम्मद शमीला अफगानिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी तर अंबाती रायु़डूला इंग्लंड दौऱ्यातून वगळण्यात आले होते. तसेच संजू सॅमसनला भारतीय अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यातून वगळण्यात आले होते.
मोहम्मद शमी गेल्या सहा महिन्यापासून सतत संकटांचा सामना करतोय. प्रथम पत्नीशी वाद त्यानंतर झालेला अपघात व योयो टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे अफगानिस्तान विरुद्धच्या कसोटीला मुकलेल्या मोहम्मद शमीच्या आयुष्यात खूप दिवसानंतर चांगली गोष्ट घडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे काय रे भाऊ?
-भुवनेश्वर-कुलदीप हे वागणं बरं नव्हे; इंग्लंडचा क्रिकेटपटू कडाडला