इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील तिसरा कसोटी सामना साउथँम्पटन येथे सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रविवारी (२३ ऑगस्ट) पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीने एक कारनामा केला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या आपल्या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये ४३ धावा पूर्ण करताच आपल्या ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या धावा त्याने १५१ डावांमध्ये पूर्ण केल्या आहेत. यासोबतच तो कसोटी क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करणारा पाकिस्तानचा पाचवा फलंदाज ठरला आहे.
अझरने ठोकले कसोटी कारकिर्दीतील १७ वे शतक
अझरने ७२.४ षटकात चौकार ठोकत आपल्या कारकिर्दीतील १७ वे शतक ठोकले आहे. त्याने २०५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. इंग्लंडविरुद्ध हे त्याचे कसोटीतील तिसरे शतक आहे. कर्णधार म्हणून हे त्याचे कसोटीतील दुसरेच शतक आहे. यापूर्वी अझरने परदेशात २०१७ साली शतक ठोकले होते.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंड संघाने जॉस बटलरच्या शतकी आणि झॅक क्राऊलेच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर ८ बाद ५८३ धावांवर आपला डाव घोषित केला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तान संघाचा डाव २७३ धावांवर संपुष्टात आला आहे. यादरम्यान अझरने नाबाद १४१ धावा ठोकल्या आहेत.
कसोटीत सर्वाधिक धावा करणारे पाकिस्तानचे अव्वल फलंदाज
१. १००९९ धावा- युनूस खान
२. ८८३२ धावा- जावेद मियाँदाद
३. ८८२९ धावा- इंझमाम उल हक
४. ७५३० धावा- मोहम्मद युसूफ
५. ६०९८* धावा- अझर अली
महत्त्वाच्या बातम्या-
-बीसीसीआयने धोनीला असा काही झटका दिला की त्याला निवृत्तीचाच घ्यावा लागला निर्णय
-…म्हणून धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पाठवले, सौरव गांगुलीने केला खुलासा
-सानिया मिर्झा म्हणते, एमएस धोनीमधले बरेच गुण शोएब मलिकसारखे
ट्रेंडिंग लेख-
-ऍशेस विजयासह २३ ऑगस्ट रोजी क्रिकेट विश्वात काय काय खास घडलं?
-जगातील अतिशय प्रतिभावान क्रिकेटपटूने ५ वर्षांपुर्वी याच दिवशी टांगले होते आपले बूट
-देशासाठी ७१ कसोटी खेळून एकही वनडे सामना खेळायला न मिळालेल्या दिग्गजाची गोष्ट