इंग्लंडचा संघ कर्णधार बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त कामगिरी करत आहे. इंग्लंडने घरच्या मैदानावर सलग दोन कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आला. या दौऱ्यात प्रत्येकी तीन- तीन सामन्यांची कसोटी, वनडे आणि टी20 मालिका खेळली गेली. यातील शेवटच्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाने दक्षिण आफ्रिकेला 9 विकेट्सने पराभूत करत मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेची सुरूवात चांगली केली होती. त्यांनी लॉर्ड्स कसोटी एक डाव आणि 12 धावांंनी जिंकत यजमान संघाला धक्का दिला होता. मात्र मॅनचेस्टर येथे झालेला दुसरा कसोटी सामना एक डाव आणि 85 धावांनी जिंकला. यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली. तिसरा सामना केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे खेळला गेला. या मालिका निर्णायक सामन्यात इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिले दोन दिवस तर वाया गेले. तर तिसऱ्या दिवशी सुरू झालेल्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 118 धावांवर संपुष्टात आला. तर चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघही 158 धावा करत सर्वबाद झाला. यामुळे त्यांना 40 धावांची आघाडी मिळाली.
या सामन्यातील पहिल्या दोन डावात एकूण 276 धावा झाल्या आणि तब्बल 20 विकेट्स पडल्या. इंग्लंडकडून ऑली रॉबिनसन आणि दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी 5-5 विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी जरी इंग्लंडच्या फलंदाजांना रोखले असले तरी त्यांच्या फलंदाजांना धावा काढण्यात अपयश आले. त्यांनी दुसऱ्या डावात 169 धावाच केल्या. यावेळी ऑली रॉबिनसन आणि जेम्स अँडरसन यांनी 2-2 विकेट्स घेतल्या तर स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) याने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
इंग्लंडने 130 धावांचे लक्ष्य एक विकेट गमावत पार केले. या विजयाने इंग्लंड संघ घरच्या मैदानावर धोकादायक ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आधी त्यांनी न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला होता. तर भारताला पाचव्या कसोटीमध्ये पराभूत केले होते.
England win The Oval Test and take the series 2-1 👏#ENGvSA | #WTC23 | https://t.co/N8y2Vli6yb pic.twitter.com/QWcPSI9OEh
— ICC (@ICC) September 12, 2022
या मालिकेचा निकाल लागताच 201-23 कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेतही बदल झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया 70 टक्क्यासह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 60 टक्क्यासह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच श्रीलंका 53.33 टक्क्यासह तिसऱ्या आणि भारत 52.08 टक्क्यासह चौथ्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
PAKvsSL: ‘या’ खेळाडूंच्या भन्नाट कामगिरीने श्रीलंका झाला सहाव्यांदा आशिया चषकाचा चॅम्पियन
Asia Cup | ‘या’ पाच प्रसंगांमुळे अंतिम सामना अधिकच रंगला, मधुशंकाने तर हद्दच केली
पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकला नाही, पण रिजवान ‘या’ बाबतीत विराटवर पडला भारी