वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (West Indies vs England) संघांमध्ये ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज संघाने ९ विकेट्स गमावत ३७३ धावा केल्या आहेत. या सामन्यात एनक्रूमा बोनेरने (Nkrumah Bonner) कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ठ खेळी खेळली आहे. त्याच्या उत्तम खेळीच्या मदतीने वेस्ट इंडिज संघाने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात ६२ धावांनी आघाडी घेतली आहे. यजमान वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडने दिलेल्या ३११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४ विकेट्सवर २०२ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. तसेच, तिसऱ्या दिवसाच्या शेवटी ९ विकेट्स गमावत ३७३ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजने कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ९०.१ षटकात केवळ १७१ धावा केल्या.
एनक्रूमा बोनेर तब्बल १० तास क्रीजवर खेळत होता, त्याने कसोटीत १२३ धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपण्याच्या २ षटके अगोदर तो बाद झाला. त्याने मागच्या वर्षी वयाच्या ३२ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला ७३ धावांवर जीवनदान मिळाले आणि जेव्हा तो १०२ आणि ११२ धावांवर होता, तेव्हा त्याला डीआरएसने वाचवले.
बोनेरने फलंदाज जेसन होल्डरसोबत ७९ धावांची भागीदारी केली. यानंतर डी सिल्वासोबत ७३ धावांची भागीदारी केली. तसेच त्याने केमार रोचसोबत ४४ आणि पेरमोलसोबत ४६ धावांची भागीदारी केली. होल्डरने आपल्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात केवळ २ धावा केल्या आणि तो ४५ धावा करून बेन स्टोक्सच्या चेंडूचा शिकार झाला.
सिल्वाची विकेट फिरकी गोलंदाज जैक लीचने घेतली. क्रेग ओव्हर्टनने अलजारी जोसेफला बाद केले. जोसेफ २ धावा करून बाद झाला. बोनेरने १० व्या कसोटीत दुसरे शतक पूर्ण केले आहे. या खेळीदरम्यान त्याने ३५५ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकार लगावला आहे. दुसऱ्या दिवशी खेळ समाप्त होण्यापूर्वी बोनेरने ३४ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
“आता रोहितने ‘तो’ फटका खेळणे बंद करावे” भारतीय दिग्गजाचा हिटमॅनला सल्ला
बंगळुरू कसोटीपूर्वी श्रीलंकेला ‘डबल धक्का’, अर्धशतकवीर निसांकासह ‘हा’ खेळाडूही संघाबाहेर
पाकिस्तानात पोहोचला ‘सर जडेजा’! आफ्रिदीने भारतीय फिरकीपटूच्या गोलंदाजीची केली नक्कल, झाला ट्रोल