भारत विरुद्ध इंग्लंड संघात गेल्या २ दिवसांपासून दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू असलेल्या या लढतीच्या तिसरी दिवशी (१५ फेब्रुवारी) दोन्ही संघ विजयासाठी झगडताना दिसत आहेत. दुसऱ्या दिवसाखेर मजबूत स्थितीत असलेल्या भारताला तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडकडून एका-नंतर-एक दणके मिळाले. त्यातही इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फोक्सने भारताच्या ३ महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले.
भारताच्या दुसऱ्या डावात पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षक रिषभ पंत फलंदाजीसाठी आला होता. आघाडीचे ३ फलंदाज बाद झाल्यानंतर संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पंतनेही पहिल्या षटकापासूनच आक्रमक रवैय्या अंगीकारत फटकेबाजीला सुरुवात केली. अशात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने डावातील २६ वे षटक फिरकीपटू जॅक लीचच्या हाती सोपवले.
लीचच्या षटकातील तिसरा चेंडू वेगाने टप्पा घेत आला आणि पंतने मोठा शॉट मारण्याच्या नादात जोराने बॅट फिरवली. परंतु दुर्दैवाने चेंडू मागे यष्टीरक्षक फोक्सच्या हाती गेला. त्याने क्षणाचाही विलंब न करता दांड्या उडवल्या आणि पंत यष्टीचीत झाला. अशाप्रकारे दुसऱ्या डावात पंत ११ चेंडूत १ चौकार मारत फक्त ८ धावा करू शकला.
https://twitter.com/ShubhmanC/status/1361176724441075715?s=20
विशेष बाब अशी की, पंतपुर्वी फोक्सने रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनाही कोंडित पकडले होते. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला मैदानावर उतरलेल्या पुजाराला त्याने ओली पोपच्या मदतीने धावबाद केले. तर रोहितला अतिशय शानदार पद्धतीने यष्टीचीत करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG 2nd Test Live : अश्विन-कोहलीची हाफ सेंचूरी पूर्ण, टीम इंडिया २०० धावांच्या नजीक
Video: बड्डे बाॅय जोमात, रोहित कोमात! बेन फोक्सचे जबरदस्त यष्टीरक्षण अन् हिटमॅनची दांडी गुल
काय अरे पुजारा.. बॅट तरी निट पकड!! पाहा कसा विचित्र पद्धतीने बाद झालाय चेतेश्वर पुजारा