सध्या न्यूझीलंडमध्ये खेळला जात असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. इंग्लंड विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखल झालेला दुसरा संघ बनला आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने दक्षिण अफ्रिका संघाला १३७ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले आहे. क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात डॅनियल वॅटने शतकी खेळी केली, तर सोफी इक्लेक्स्टनने सहा विकेट्स घेतल्या. आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात भिडतील.
मागच्या आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women’s World Cup) स्पर्धेत इंग्लंडने विजेतेपद पटकावले होते. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने महिला विश्वचषकाचे विजेतेपद आतापर्यंत ६ वेळा मिळवले आहे. आता या दोन बलाढ्य संघांमध्ये पुन्हा एकदा विजेतेपदासाठी आमना सामना होईल.
क्राइस्टचर्चाच्या हेगले ओवल स्टेडियमवर हा दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण अफ्रिका संघाने नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडची सुरुवात अपेक्षित होऊ शकली नाही. इंग्लंडची धावसंख्या १० असताना त्यांनी पहिली विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार हीथर नाइट (१) आणि नॅट सिवरने (१५) स्वतःच्या विकेट स्वस्तात गमावल्या. इंग्लंडची धावसंख्या ७७ असताना त्यांनी तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. परंतु सलामीवीर डॅनियल वॅट (Danny Wyatt) खेळपट्टीवर कामय होती. डॅनियलने एमी जॉन्स (२८) सोबत ४९, तर सोफिया डंकले (६०) सोबत ११६ धावांची भागीदारी केली.
Congratulations England 👏
They win five matches in a row to reach the #CWC22 final 👊 pic.twitter.com/IdzT1EJh3O
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 31, 2022
या दोन महत्वाच्या भागीदाऱ्या करताना डॅनियल वॅटने स्वतःचे शतक पूर्ण केले, तर डंकलेने स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकांमध्ये सोफी एक्लेस्टनने ११ चेंडूत २४ धावांची खेळी केली. सर्व खेळाडूंनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या नुकसानावर २९३ धावा केल्या. डेनियल वॅटने इंग्लंडसाठी १२५ चेंडूत सर्वाधिक १२९ धावा केल्या. तसेच दक्षिण अफ्रिकी गोलंदाज शबनिम इस्माइलने तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिका संघाची सुरुवात खूपच खराब झाली. दक्षिण अफ्रिका संघाने अवघ्या ८ धावांवर त्यांच्या सालामीवीर जोडीच्या विकेट्स गमावल्या. त्यानंतर लारा गुडाल (२८) आणि सुने लूस (२१) यांनी मिळून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्या देखील अपयशी ठरल्या. अफ्रिकी संघ ठराविक अंतरावर विकेट्स गमावत गेला आणि त्यांच्या संघासाठी एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. पाहता-पाहता दक्षिण अफ्रिकेचा पूर्ण संघ ३८ षटकांमध्ये आणि १५६ धावा करून सर्वबाद झाला. अफ्रिकी संघासाठी एकही खेळाडू अर्धशतकी खेळी करू शकला नाही. इंग्लंडची गोलंदाज सोफी एक्लेस्टोनने (Sophie Ecclestone) ३६ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल इतिहासातील सर्वात खराब रिव्ह्यू! आरसीबीच्या कर्णधाराची सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरची १९व्या षटकात ‘मोठी’ चूक, गमावला हाताशी आलेला सामना!
CSK vs LSG | केव्हा आणि कसा पाहाल चेन्नई वि. लखनऊ सामना, कसे असेल हवामान, जाणून घ्या सर्वकाही