पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडचा विजय; मालिकेतही साधली बरोबरी

लंडन। रविवारी(15 सप्टेंबर) पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर इंग्लंडने 5 सामन्यांच्या ऍशेस कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले आहे.

या सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव रविवारी 329 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावात घेतलेल्या 69 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 77 षटकात सर्वबाद 263 धावा करता आल्या.

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मॅथ्यू वेडने 166 चेंडूत 117 धावांची शतकी खेळी करत एकाकी झूंज दिली. मात्र त्याला अन्य फलंदाजांकडून भक्कम साथ मिळाली नाही.

वेडने स्टिव्ह स्मिथ 23 धावांवर बाद झाल्यानंतर मिशेल मार्शसह पाचव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली होती. पण मार्शला 24 धावांवर जो रुटने बाद करत ही भागीदारी तोडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनबरोबरही वेडने 52 धावांची भागीदारी केली. परंतू पेनही 21 धावा करुन बाद झाला.

यानंतर काहीवेळाने रुटने एकाकी झूंज देणाऱ्या वेडलाही 117 धावांवर बाद करत इंग्लंडला विजयाच्या समीप पोहचवले. अखेर जॅक लीचने ऑस्ट्रेलियाचे नॅथन लायन आणि जॉस हेजलवूडला एकाच षटकात बाद करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपूष्टात आणला.

इंग्लंडकडून या डावात लीच आणि स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तर जो रुटने 2 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो डेन्लीने 94 धावांची खेळी केली होती. त्याचे शतक केवळ 6 धावांनी हुकले. तसेच बेन स्टोक्सने 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर जॉस बटलरने 47 धावांची छोटेखानी खेळी केली. या डावात ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच पिटर सिडल, पॅट कमिन्स आणि मिशेल मार्शने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 294 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद 225 धावां करता आल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक – 

इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 294 धावा (इंग्लंड – जॉस बटलर – 70 धावा, ऑस्ट्रेलिया – मिशेल मार्श – 46 धावांत 5 विकेट्स)

ऑस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद 225 धावा (ऑस्ट्रेलिया – स्टिव्ह स्मिथ – 80 धावा, इंग्लंड – जोफ्रा आर्चर – 62 धावांत 6 विकेट्स)

इंग्लंड दुसरा डाव – सर्वबाद 329 धावा (इंग्लंड – जो डेन्ली – 94 धावा, ऑस्ट्रेलिया – नॅथन लायन – 69 धावांत 4 विकेट्स)

ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – सर्वबाद 263 धावा (ऑस्ट्रेलिया – मॅथ्यू वेड – 117 धावा, इंग्लंड – स्टुअर्ट ब्रॉड – 62 धावांत 4 विकेट्स, जॅक लीच – 49 धावांत 4 विकेट्स)

सामनावीर – जोफ्रा आर्चर

मालिकावीर –

ऑस्ट्रेलिया – स्टिव्ह स्मिथ,

इंग्लंड – बेन स्टोक्स

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

टीम इंडियात संधी न मिळालेला दिनेश कार्तिक सांभाळणार या संघाचे कर्णधारपद

२३ धावांवर बाद होऊनही स्टिव्ह स्मिथने केला हा मोठा विक्रम

भारत-दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी२० सामना रद्द..

You might also like

Leave A Reply