टीम इंडियात संधी न मिळालेला दिनेश कार्तिक सांभाळणार या संघाचे कर्णधारपद

24 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी तमिळनाडू संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिककडे सोपवण्यात आले आहे. तसेच अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर या संघाचे उपकर्णधारपद सांभाळणार आहे.

तमिळनाडूच्या या संघात मुरली विजय, बाबा अपराजित आणि अभिनव मुकुंद यांचाही समावेश आहे. तसेच फिरकी गोलंदाजांमध्ये मुरुगन अश्विन, आर साई किशोर, वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळाली आहे.

त्याचबरोबर मुरली विजय सध्या इंग्लिश कौउंटी क्रिकेटमध्ये सोमरसेटकडून खेळत आहे. त्यामुळे तो पुन्हा येईपर्यंत एम शाहरुख खान हा त्याचा बदली खेळाडू म्हणून संघात असेल.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी तमिळनाडूचा समावेश सी गटात असून, या गटात बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मिर, मध्यप्रदेश, रेल्वे, राजस्थान, सर्विस आणि त्रिपूरा संघांचाही समावेश आहे.

विजय हजारे ट्रॉफी 2019 स्पर्धेसाठी असा आहे तमिळनाडू संघ – 

दिनेश कार्तिक (कर्णधार), विजय शंकर (उपकर्णधार), अभिनव मुकुंद, मुरली विजय, बाबा अपराजित, मुरुगन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, आर साई किशोर, एन जगदीसन, टी नटराजन, के विग्नेश, एम मोहम्मद, एम सिद्धार्थ, अभिषेक तन्वर, सी हरी निशांत, जे कौशिक.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

२३ धावांवर बाद होऊनही स्टिव्ह स्मिथने केला हा मोठा विक्रम

भारत-दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी२० सामना रद्द..

११ धावांवर बाद होत वॉर्नरने मोडला ६१ वर्षांपूर्वीचा नकोसा विक्रम

You might also like

Leave A Reply