---Advertisement---

न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा, दुखापतीमुळे उपकर्णधार मालिकेला मुकणार

On: गुरूवार, जानेवारी 14, 2021 5:10 PM
---Advertisement---

न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी नुकतीच इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. वनडे आणि टी-२० या दोन्ही मालिकांसाठी यावेळी संघ जाहीर करण्यात आला. इंग्लंडची उपकर्णधार अॅन्या श्रुबसोल दुखपातीमुळे या संघात स्थान मिळवू शकली नाही. ती संपूर्ण दौऱ्याला मुकणार आहे.

वनडे आणि टी-२० मालिकेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही संघाचे नेतृत्व हीथर नाइटकडे सोपवण्यात आले आहे.

या संघात सोफिया डंकलीने आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. तिने आपला शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात खेळला होता. त्याचप्रमाणे डावखुरी वेगवान गोलंदाज ताश फरांट हिचे दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन झाले आहे. तिने मागील वर्षी स्थानिक स्पर्धेत दमदार कामगिरी करून लक्ष वेधून घेतले होते. त्याच कामगिरीचे फळ म्हणून तिला संघात स्थान मिळाले आहे.

इंग्लंडच्या महिला क्रिकेटचे डायरेक्टर जोनाथन फिंच याबाबत बोलताना म्हणाले, “आम्ही न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. आणि या कठीण परिस्थितीत देखील पूर्ण समर्पणाने झोकून देऊन खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढील २४ महिने आमच्यासाठी महत्वाचे आहेत कारण या काळात दोन जागतिक स्पर्धांचे आयोजन होणार आहे. ज्यात महिला विश्वचषक आणि बर्मिंगहॅममधील कॉमनवेल्थ गेम्सचा समावेश आहेत. इंग्लंडच्या संघाने या दोन्ही स्पर्धांमध्ये भरघोस यश मिळवावे, अशीच आमची इच्छा आहे.”

इंग्लंडचा संपूर्ण संघ:

हीथर नाइट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, कॅथरिन ब्रंट, केट क्रॉस, फ्रेया डेविस, सोफिया डंकली, सोफी एक्लेसटोन, जॉर्जिया एलविस, ताश फरांट, सारा ग्लेन, एमी जोन्स, नताली सीवर, मॅडी विलर्स, फ्रैन विल्सन, लॉरैन विनफील्ड हिल, डॅनियल व्याट.

महत्वाच्या बातम्या:

हॉटेलच्या खोलीत येताच तो रडू लागला, आर अश्विनच्या पत्नीचा मोठा खुलासा

नॅथन लॉयनपेक्षा अश्विनकडे ८०० बळी घेण्याची क्षमता अधिक, माजी महान फिरकीपटूने मांडले मत

दोन दशकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा गाजतोय अझरुद्दीन; काय आहे नावामागील मनोरंजक रहस्य, वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---