इंग्लंड क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध इंग्लंड संघात 3 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात बुधवारपासून (दि. 1 मार्च) ढाका येथे झाली. या सामन्यात इंग्लंड संघाने 3 विकेट्सने दमदार विजय मिळवला. विशेष म्हणजे, संघ अडचणीत असताना डेविड मलान याने वादळी फलंदाजी करत शतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
सामन्याचा आढावा
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी बांगलादेशने 47.2 षटकात सर्व विकेट्स गमावत 209 धावा केल्या. हे आव्हान इंग्लंड संघाने 48.4 षटकात 7 विकेट्स गमावत 212 धावा चोपून पार केले. तसेच, सामना 3 विकेट्स राखून खिशात घातला. यासोबतच मालिकेत 1-0ने आघाडी घेतली.
Dawid Malan's brilliant hundred guides England to a win against Bangladesh in the first ODI 🙌#BANvENG | 📝 Scorecard: https://t.co/ssDaqaen3F pic.twitter.com/ZONMbJHPCj
— ICC (@ICC) March 1, 2023
डेविड मलान बनला इंग्लंडच्या विजयाचा हिरो
बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने अवघ्या 65 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. यामध्ये जेसन रॉय (4), फिलिप सॉल्ट (12), जेम्स विन्स (6) आणि कर्णधार जोस बटलर (9) यांच्या विकेट्सचा समावेश होता. यावेळी संघाची स्थिती खराब असताना तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या डेविड मलान (David Malan) याने शेवटपर्यंत भक्कमरीत्या डाव सांभाळत कडवी झुंज दिली. त्याने यादरम्यान सर्वाधिक नाबाद 114 धावा कुटल्या. या धावा त्याने 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 145 चेंडूत पूर्ण केल्या. त्याच्याव्यतिरिक्त कुणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. फक्त विल जॅक्स (24) याने 20 धावांचा आकडा पार केला. इतर एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही.
👑@dmalan29 👏
🇧🇩 #BANvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/8kpGJoVzWd
— England Cricket (@englandcricket) March 1, 2023
यावेळी बांगलादेशकडून गोलंदाजी करताना तैजूल इस्लाम याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने 10 षटकात 54 धावा खर्च करत 3 विकेट्स नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त मेहिदी हसनने 2, तर शाकिब अल हसन आणि तस्कीन अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
बांगलादेश 209 धावांवर ढेपाळला
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशकडून फक्त 3 फलंदाजांनाच 20 धावांचा आकडा पार करता आला. त्यात नजमुल शांतो (58), महमदुल्लाह (31) आणि तमिम इकबाल (23) यांचा समावेश होता. नजमुलने 82 चेंडूत सर्वाधिक 58 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 6 चौकारही मारले. त्यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही.
यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना चार गोलंदाजांनी 2, तर दोन गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. दोन विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये जोफ्रा आर्चर, मार्क वूड, मोईन अली आणि आदिल रशीद यांचा समावेश होता. तसेच, एक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये ख्रिस वोक्स आणि विल जॅक्स यांचा समावेश होता.
बांगलादेश विरुद्ध इंग्लंड (Bangladesh vs England) संघातील दुसरा वनडे सामना शुक्रवारी (दि. 3 मार्च) ढाका येथे खेळला जाणार आहे. (england won by 3 wickets against bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: लग्नाच्या बेडीत अडकलेल्या शार्दुलचा पत्नीसाठी झक्कास उखाणा; म्हणाला, ‘बॉलिंग करतो क्वीक…’
थेट ‘सिक्सर किंग’ युवीला पछाडत उमेश ‘स्पेशल’ यादीत! रवी शास्त्रींचा पराक्रमही ध्वस्त