आज श्रीलंकेच्या मलिंदा पुष्पाकुमाराने तब्बल ९९ प्रथम श्रेणी सामने खेळल्यानंतर आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले. त्याबरोबर मोठी चर्चा सुरु झाली की आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वी सर्वाधिक सामने कोणता खेळाडू खेळाला असेल?
तर तो खेळाडू आहे इंग्लंडचा विलिअम एव्हर्ट अस्टील. १ मार्च १९८८ साली जन्म झालेल्या या खेळाडूला कसोटी पदार्पणची संधी ही वयाच्या ४०व्या वर्षी मिळाली. तेव्हा त्यांनी तब्बल ४२३ प्रथम श्रेणी सामने खेळले होते.
कारकिर्दीत विलिअम एव्हर्ट अस्टील एकूण ७३३ प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यात त्यांनी अष्टपैलू प्रदर्शन करत २४३२ विकेट्स आणि २२७३५ धावा केल्या. राष्ट्रीय संघाकडून या क्रिकेटपटूला केवळ ९ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यात त्याने १९० धावा आणि २५ बळी मिळवले.
इंग्लडचेच जोसेफ वाइन यांनी तब्बल ४०३ सामने खेळल्यावर कसोटी पदार्पण केले होते. ते या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहेत.
वयाच्या ६० व्या वर्षी विलिअम एव्हर्ट अस्टील यांचे निधन झाले. तेव्हा ते सार्वधिक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १५व्या स्थानी होते. ते वयाच्या ५३व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळत होते.
Photo credit: Leicestershire County Cricket Club