Rishabh Pant: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रिषभ पंतच्या दुखापतीमुळे चर्चेत राहिली आहे. त्याला पहिल्या दिवशी अंगठ्याला दुखापत झाली होती आणि तपासणीत त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. त्याने यष्टीरक्षण केले नाही, परंतु अंगठ्याला फ्रॅक्चर असूनही तो फलंदाजी करण्यासाठी आला. दुसऱ्या दिवशी जेव्हा पंत फलंदाजीला आला, तेव्हा त्याला ‘वॉरियर’ म्हणून संबोधण्यात आले, पण इंग्लंडच्या एका दिग्गजाने त्याच्यावर ‘चीटिंग’चे आरोप केले आहेत. डेव्हिड लॉयडने आरोप केले की, पंतने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आपली दुखापत वाढवून दाखवण्याचा प्रयत्न केला. (Rishabh Pant injury controversy)
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड यांनी ‘टॉकस्पोर्ट क्रिकेट’वर चर्चा करताना सांगितले, “मी आज ‘लीजेंड्स लाउंज’मध्ये उपस्थित होतो, जिथे लोकांनी एकमताने सांगितले, ‘रिषभ पंत आपल्या दुखापतीचा फायदा घेत आहे. ती इतकी गंभीर असू शकत नाही.’ पंत जेव्हा जिन्यावरून खाली उतरत होता, तेव्हा त्याने दुखापत वाढवून दाखवली आहे. एका-दोन लोकांनी तर रिषभ पंतला ‘टाइम आउट’ द्यावा, असा सल्लाही दिला.” (David Lloyd cheating accusation)
एकीकडे डेव्हिड लॉयड यांनी पंतवर टीका केली, तर दुसरीकडे त्यांनी आयसीसीला बदली नियमांमध्ये बदल करण्याची मागणीही केली. लॉयड म्हणाले की, ते जखमी खेळाडूंसाठी ‘रनर’ नियमाच्या पूर्णपणे विरोधात आहेत, पण गंभीर दुखापतीच्या परिस्थितीत बदली खेळाडू आणण्याच्या नियमाला त्यांनी पाठिंबा दिला. (ICC substitute rule criticism)
ते म्हणाले, “बदली नियमांमध्ये अनेक त्रुटी आहेत, पण जर एखादा खेळाडू गंभीररीत्या जखमी झाला, तर त्याच्यासाठी ‘लाइक फॉर लाइक रिप्लेसमेंट’चा नियम आणला पाहिजे. यावर नक्कीच विचार केला पाहिजे, पण फलंदाजाच्या जागी फिरकीपटूचा बदली म्हणून समावेश करावा लागू नये.” (Cricket rules debate)






