कोरोना व्हायरस जगभरात हाहाकार माजवत आहे. त्याचे पडसाद क्रिकेट जगतात पहायला मिळत आहेत. या व्हायरसचा फटका अनेक क्रीडा स्पर्धांना बसला आहे. यात क्रिकेट जगतातील अनेक सामन्यांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे.
19 मार्चपासून इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (England vs Sri Lanka) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिकेला सुरुवात होणार होती. परंतु कोरोना व्हायरसचा (Corona Virus) वाढता प्रादूर्भाव पाहता ही मालिका एका आठड्यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे. तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) इंग्लंड संघाला परत बोलावले आहे. आता इंग्लंड संघ लवकरच मायदेशात परतणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसला जागतिक साथीचा आजार म्हणून घोषित केले आहे. कोरोना व्हायरस जगातील 90 देशांमध्ये पसरला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपले खेळाडू, चाहते आणि इतर भागीदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. अनेक बोर्डांनी प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत सामने खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर, इंग्लंड आणि श्रीलंका यांनी मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
“कोरोना जगभरात पसरल्यानंतर आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाशी चर्चा केल्यानंतर, आज (13 मार्च) आम्ही आमच्या खेळाडूंना ब्रिटनला परत नेण्याचा तसेच श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील आगामी कसोटी मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे,” असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले.
“यावेळी आमच्या खेळाडूंचे आणि सपोर्ट स्टाफचे शारीरिक आणि मानसिक संतुलन सर्वात महत्त्वाचे आहे. आता आम्ही त्यांना लवकरात लवकर त्यांच्या घरी आणण्याचा विचार करत आहोत,” असेही यावेळी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले.
ट्रेंडिंग बातम्या-
– बीसीसीआयचा दिवसातला दुसरा मोठा निर्णय; भारत-दक्षिण आफ्रिका मालिका रद्द
– तिच्या एका ट्विटने पुरुष क्रिकेटपटूंना जमीनीवर आणले…
–अखेर ऑस्ट्रेलियाच्या त्या खेळाडूला असणारा कोरोना व्हायरसचा धोका टळला!