सध्या भारत-इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. दरम्यान दोन्ही संघातील चौथा टी20 सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 15 धावांनी धुव्वा उडवत मालिका आपल्या खिशात घातली. तत्पूर्वी या सामन्यादरम्यान शिवम दुबेच्या (Shivam Dube) जागी ‘कंकशन सब’ म्हणून हर्षित राणाला खेळवल्याने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) नाराज होता. दरम्यान त्याने अनेक प्रश्नही उपस्थित केले.
भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक माॅर्ने मॉर्केल (Morne Morkel) यांनी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरच्या (Jos Buttler) या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मॉर्केलने या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले की, युवा वेगवान गोलंदाजाचे नाव पुढे आल्यानंतर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी अंतिम निर्णय घेतला.
भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात, जेमी ओव्हरटनचा पाचवा चेंडू दुबेच्या हेल्मेटला लागला, ज्यामुळे त्याला दुखापतीचा नियम पाळण्यात आला. दुबेने 34 चेंडूत 53 धावा केल्या. जरी तो शेवटच्या चेंडूचा सामना करत होता, तरी जेव्हा भारत 181 धावांचा बचाव करण्यासाठी मैदानात आला, तेव्हा हर्षित राणा त्याच्या जागी क्षेत्ररक्षणाला आला.
भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक माॅर्ने मॉर्केल म्हणाले, “माझ्या माहितीनुसार, जेव्हा शिवम दुबे डोक्याला मार लागल्यावर ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला, तेव्हा त्याने डोकेदुखीची तक्रार केली. त्यानंतर आम्ही मॅच रेफ्रींना कन्कशन सबसाठी नाव पाठवले. याबाबत निर्णय घेणे हे मॅच रेफ्रीवर अवलंबून आहे.”
माॅर्ने मॉर्केलला (Morne Morkel) सांगण्यात आले की, बटलर या बदलावर खूश नाही कारण समान क्षमतेच्या खेळाडूला ‘कंकशन सब’ म्हणून मैदानात उतरवले जाते आणि राणा हा वेगवान गोलंदाज आहे तर दुबे मध्यमगती गोलंदाजी करतो. मॉर्केल म्हणाला, “तुम्हाला माहिती आहे की हे ठरवण्याचा अधिकार माझ्यापेक्षा वरच्या लोकांकडे (मॅच रेफरी) आहे. सामनाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. आम्ही त्यांच्यासमोर फक्त नाव ठेवले होते. आम्हाला यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये अनसोल्ड ठरलेल्या स्टार खेळाडूची SA20 मध्ये धमाकेदार कामगिरी!
38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; महाराष्ट्राचे दोन्ही खो खो संघ जेतेपदापासून एक पाऊल दूर!
38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; रग्बीमध्ये महाराष्ट्राला 1 रौप्य, 1 कांस्यपदक