---Advertisement---

4th Test Live: अखेरच्या दिवसाचा रोमांच वाढला; चौथ्या दिवसाखेर इंग्लंडच्या सलामीवीरांची नाबाद ७७ धावांची सलामी

Rory Burns and Haseeb Hameed
---Advertisement---

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून (२ सप्टेंबर) चौथा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्याचा रविवारी (५ सप्टेंबर) चौथा दिवस होता. या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात ३२ षटकांत बिनबाद ७७ धावा केल्या आहेत. आता अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी अजून २९१ धावांची गरज आहे, तर भारताला १० विकेट्स घेण्याची गरज असेल.

भारताने इंग्लंडला विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लडकडून रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद यांची जोडी सलामीला मैदानात उतरली. या दोघांनी चौथा दिवस संपेपर्यंत भारताला यश मिळू दिले नाही. त्यांनी अर्धशतकी भागीदारी रचत इंग्लंडचे सामन्यातील आव्हान मजबूत केले. दिवसाखेर बर्न्स ३१ धावांवर नाबाद खेळत होता, तर हमीद ४३ धावांवर नाबाद खेळत होता.

भारताचे इंग्लंडला ३६८ धावांचे आव्हान

भारताने दुसऱ्या डावात १४८.२ षटकांत सर्वबाद ४६६ धावा केल्या. त्यामुळे ३६७ धावांची आघाडी घेत इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान ठेवले.

भारताकडून दुसऱ्या डावात रोहित शर्माने १२७ धावांची शतकी खेळी केली. तर, चेतेश्वर पुजारा (६१), शार्दुल ठाकूर (६०) आणि रिषभ पंत (५०) यांनी अर्धशतके केली. तसेच केएल राहुलने ४६ धावांचे आणि विराट कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच ऑली रॉबिन्सन आणि मोईन अलीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. जेम्स अँडरसन, क्रेग ओव्हरटन आणि जो रुटने प्रत्येकी १ विकेट घेतली.

शेपटाचा तडाखा

दुसऱ्या सत्रापर्यंत भारताचे ८ विकेट्स गेल्या होत्या. पण, यानंतरही इंग्लंडला तिसऱ्या सत्रात भारताचा डाव झटपट संपवण्यात अपयश आले. भारताने अखेरच्या २ विकेट्ससाठी तब्बल ५२ धावा जोडल्या. उमेश यादव आणि बुमराह यांची जोडी ख्रिस वोक्सने बुमराहला २४ धावांवर बाद करत तोडली. तर, उमेशला अखेर १४९ व्या षटकात क्रेग ओव्हरटनने २५ धावांवर बाद करत भारताचा डाव ४६६ धावांवर संपुष्टात आणला. सिराज ३ धावांवर नाबाद राहिला.

पंत-शार्दुलचा अर्धशतकी धमाका

दुसऱ्या सत्रात रिषभ पंत आणि रिषभ पंत या दोघांनी इंग्लंडला मोठे यश मिळू दिले नाही. या दोघांनी आपली विकेट जाणार नाही याची काळजी घेत खराब चेंडूंचा चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर भारताचा धावफलक सतत हलता राहिल, या गोष्टीकडेही दोघांनी लक्ष दिले. या दोघांनी शतकी भागीदारी करता भारताची आघाडीही ३०० धावा पार नेत संघाला भक्कम स्थितीत उभे केले.

दरम्यान, शार्दुल ठाकूरने सामन्यातील सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने याच सामन्यातील पहिल्या डावातही ५७ धावांची खेळी केली होती. त्याने दुसऱ्या डावात ६५ चेंडूत त्याने अर्धशतक केले. मात्र, तो त्यानंतर लगेचच ६० धावांवर जो रुटविरुद्ध खेळताना क्रेग ओव्हरटनकडे झेल देऊन बाद झाला.

त्यानंतर पंतनेही अर्धशतक पूर्ण केले. पण, तोही अर्धशतक करुन लगेचच बाद झाला. त्याला मोईन अलीने १३८ व्या षटकात ५० धावांवर बाद केले. मात्र, यानंतर उमेश यादव आणि जसप्रीत बुमराहने आक्रमक खेळ करत भारताच्या धावसंख्येत आणखी भर घातली.

भारताने दुसऱ्या सत्राखेरपर्यंत १४४ षटकात ८ बाद ४४५ धावा केल्या असून भारताकडे आता ३४६ धावांची आघाडी आहे.

ख्रिस वोक्सने भारताला दिले धक्के

चौथ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावातील ९२ व्या षटकापासून आणि ३ बाद २७० धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताकडून तिसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेली विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांच्या जोडीने चौख्या दिवशी फलंदाजीची सुरुवात केली. मात्र, फार काळ टिकू शकली नाही. १०२ व्या षटकात जडेजाला ख्रिस वोक्सने १७ धावांवर बाद केले. याच षटकात अजिंक्य रहाणेला डीआरएस रिव्ह्यू घेतल्याने जीवदान मिळाले.

मात्र, रहाणे देखील फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही. ख्रिस वोक्सनेच त्याला १०४ व्या षटकात शुन्यावर बाद करत भारताला ५ वा धक्का दिला. त्यानंतर काहीवेळातच विराटही १११ व्या षटकात मोईल अली विरुद्ध स्लीपमध्ये क्रेग ओव्हरटनकडे सोपा झेल देऊन ४४ धावांवर बाद झाला.

यानंतर रिषभ पंतने शार्दुल ठाकूरसह फलंदाजी करताना पहिल्या सत्राखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. त्यामुळे सध्या भारताने ११८ षटकांत ६ बाद ३२९ धावा अशी झाली असून भारताकडे सध्या २३० धावांची आघाडी आहे.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात १९१ धावा केल्या आहेत. तर इंग्लंडने पहिल्या डावात २९० धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---