लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून (२ सप्टेंबर) ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरु झाला आहे. शुक्रवारी (३ सप्टेंबर) या सामन्याचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात १६ षटकांत बिनबाद ४३ धावा केल्या आहेत. तसेच भारतीय संघ अजून ५६ धावांनी पिछाडीवर आहे.
इंग्लंडला पहिल्या डावात २९० धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारताकडून दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि केएल राहुल ही जोडी सलामीला फलंदाजीसाठी उतरली. या दोघांनीही भारताला चांगली सुरुवात करुन देताना आपली विकेट जाणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळे भारताने दिवसाखेर एकही विकेट गमावली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रोहित २० धावांवर आणि केएल राहुल २२ धावांवर नाबाद होता.
Rohit Sharma and KL Rahul take India to stumps on 43/0, trailing England by 56.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFj1Srx pic.twitter.com/2Lxp68jbPY
— ICC (@ICC) September 3, 2021
इंग्लंडकडे ९९ धावांची आघाडी
दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ८४ षटकांत २९० धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने ९९ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून ऑली पोपने सर्वाधिक ८१ धावा केल्या. तसेच ख्रिस वोक्सने ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. याशिवाय डेव्हिड मलाने ३१, जॉनी बेअरस्टो ३७ आणि मोईन अलीने ३५ धावांची छोटेखाली खेळी केल्या.
भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबक शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी १ विकेट घेतली.
England are all out for 290!
Great contribution from @chriswoakes, who made an impressive 50 👏#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFj1Srx pic.twitter.com/WaagEFjDVJ
— ICC (@ICC) September 3, 2021
शेपटाचा तडाखा
दुसऱ्या सत्रात ऑली पोपने बेअरस्टो आणि मोईन अलीसह फलंदाजी करताना डाव सावरला होता. दरम्यान, त्याने अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, तिसऱ्या सत्रात तो फार काळ टिकू शकला नाही. ७७ व्या षटकात शार्दुल ठाकूरने त्याला त्रिफळाचीत करत इंग्लंडला ८ वा धक्का दिला. पोपने १५९ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार मारले.
A very impressive innings comes to an end.
Scorecard/Clips: https://t.co/Kh5KyTSOMS
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/QACL9hKLU5
— England Cricket (@englandcricket) September 3, 2021
तो बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजाने ऑली रॉबिन्सनला ५ धावांवर त्रिफळाचीत केले. पण यानंतर ख्रिस वोक्स आणि जेम्स अँडरसनने भारतीय गोलंदाजांना अखेरच्या विकेटसाठी बरीच प्रतिक्षा करायला लावली. दरम्यान, वोक्सने अर्धशतकही पूर्ण केले. या दोघांनी अखेरच्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी रचली. अखेर ८४ व्या षटकात वोक्स ६० चेंडूत ५० धावा करुन धावबाद झाला आणि इंग्लंडचा डाव २९० धावांवर संपला. अँडरसन १ धावेवर नाबाद राहिला.
ऑली पोपचे अर्धशतक
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सुरुवातीला मिळालेल्या धक्क्यांनंतर ऑली पोप आणि जॉनी बेअरस्टोने डाव सावरला होता. या दोघांनी दुसऱ्या सत्राचीही चांगली सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या सत्रात त्यांची जोडी फार काळ मोहम्मद सिराजने टिकू दिली नाही. त्याने बेअरस्टोला ४७ व्या षटकात पायचीत केले. बेअरस्टोने डीआरएसची मागणी केली होती. मात्र, डीआरएसमध्येही तो बाद असल्याचे दिसल्याने त्याला ३७ धावांवर माघारी फिरावे लागले. त्यामुळे त्याची आणि पोपमधील ८९ धावांची भागीदारीही संपली.
पण, त्यानंतर मोईन अलीने पोपला भक्कम साथ दिली. दरम्यान, पोपने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटीतील ६ वे अर्धशतक आहे. मोईन अली आणि पोप यांनीही भारतीय गोलंदाजांना मोठे यश मिळणार नाही याची काळजी घेत अर्धशतकी भागीदारी रचली. तसेच त्यांनी इंग्लंडलाही आघाडीवर नेले. पण अखेर मोईन अलीची एक चूक महागात पडली आणि ही भागीदारी तुटली.
An excellent 5️⃣0️⃣ @OPope32! 👏
Scorecard/Clips: https://t.co/Kh5KyTSOMS @IGCom | 🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/KUli5vQjlw
— England Cricket (@englandcricket) September 3, 2021
मोईन अलीने ६८ व्या षटकात रविंद्र जडेजाविरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा हा प्रयत्न फसला आणि चेंडू कव्हरला क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहित शर्माच्या हातात जाऊन विसावला. त्यामुळे पोप आणि अलीची ७१ धावांची भागीदारी तुटली.
अली बाद झाल्यानंतर ख्रिस वोक्स फलंदाजीला आला. इंग्लंडने दुसरे सत्र संपले तेव्हा ७० षटकांत ७ बाद २२७ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला ३६ धावांची आघाडी मिळाली आहे. पोप ७४ धावांवर आणि वोक्स ४ धावांवर नाबाद खेळत आहे.
India claimed two wickets in the afternoon session while England added 88 runs to their total.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFj1Srx pic.twitter.com/3twRKA1qZj
— ICC (@ICC) September 3, 2021
बेअरस्टो-पोपची अर्धशतकी भागीदारी
दुसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावातील १८ व्या षटकापासून आणि ३ बाद ५३ धावसंख्येपासून पुढे खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी इंग्लंडकडून पहिल्या दिवसाखेर नाबाद असणारी जोडी डेव्हिड मलान आणि क्रेग ओव्हरटन मैदानात उतरली. मात्र, त्यांना फार काही करता आले नाही.
उमेश यादवने १९ व्या षटकात नाईटवॉटमन म्हणून खेळायला आलेल्या ओव्हरटनला १ धावेवर बाद केले. त्यापाठोपाठ २५ व्या षटकात मलानलाही उमेशनेच त्रिफळाचीत करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. मलानने ३१ धावा केल्या.
यानंतर मात्र, ऑली पोप आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडचा डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान या दोघांनी काही आक्रमक फटकेही खेळले. ३१ व्या षटकात शार्दुल ठाकूरविरुद्ध पोपने सलग ४ चौकार मारले, तर ३२ व्या षटकात मोहम्मद सिराजविरुद्ध बेअरस्टोने सलग ३ चौकार ठोकले. या दोघांनी इंग्लंडला सावरताना पहिल्या सत्रात आणखी पडझड होणार नाही, याचीही काळजी घेतली.
त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात ४२ षटकांत ५ बाद १३९ धावा केल्या असून अद्याप इंग्लंड संघ ५२ धावांनी पिछाडीवर आहे.
After losing two early wickets, Ollie Pope and Jonny Bairstow take England to lunch at 139/5, on day two.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFj1Srx pic.twitter.com/zq2L3kl4PJ
— ICC (@ICC) September 3, 2021
या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात आला आहे.