लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून (२ सप्टेंबर) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना सुरु झाला आहे. केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात ९२ षटकांत ३ बाद २७० धावा केल्या. तसेच १७१ धावांची आघाडी घेतली.
दुसरे सत्र रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी पूर्ण खेळून काढले होते. त्यांनी तिसऱ्या सत्राची सुरुवातही चांगली केली. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच पुजाराने अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी भारताचा धावफलक हलता ठेवताना दीडशतकी भागीदारी देखील पूर्ण केली. मात्र, दुसरा नवीन चेंडू इंग्लंडसाठी उपलब्ध झाल्यानंतर मात्र, या दोघांच्याही विकेट्स एकाच षटकात गेल्या.
रॉबिन्सनने ८१ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहितला बाद केले. त्याचा झेल डिप स्क्वेअर लेगला ख्रिस वोक्सने घेतला. रोहितने २५६ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह १२७ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पुजारा स्लीपमध्ये उभ्या असलेल्या मोईन अलीकडे झेल देत ६१ धावांवर बाद झाला.
HERE WE GO.
Two wickets in the first over with the second new ball! 🙌
Scorecard/Clips: https://t.co/Kh5KyTSOMS
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/eiiedSqEtK
— England Cricket (@englandcricket) September 4, 2021
त्यामुळे विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांची नवी जोडी मैदानात उतरली. या दोघांनीही चांगला खेळ करताना इंग्लंडला लगेचच यश मिळू दिले नाही. या दोघांची भागीदारी रंगत असतानाच ९२ वे षटक संपल्यानंतर कमी प्रकाशाच्या कारणाने खेळ थांबवण्यात आला. यावेळी भारताने ३ बाद २७० धावा केल्या होत्या. तसेच १७१ धावांची आघाडी घेतली होती. विराट २२ धावांवर खेळत आहे, तर जडेजा ९ धावांवर नाबाद आहे.
रोहित शर्माचा शतकी धमाका
रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी पहिल्या सत्रातीलच लय दुसऱ्या सत्रातही कायम ठेवताना भारताची आघाडी वाढवत नेली. एका बाजूने रोहितने सावध खेळ केला, तर दुसऱ्या बाजून पुजाराने काहीसा आक्रमक पवित्रा स्विकारलेला दिसला. दरम्यान रोहितने त्याचे मालिकेतील पहिले शतक पूर्ण केले. त्याने ६४ व्या षटकात मोईन अलीविरुद्ध षटकार खेचत त्याचे शतक पूर्ण केले. हे शतक त्याने २०४ चेंडूत पूर्ण केले.
या खेळीदरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ११ हजार धावा, तर कसोटी कारकिर्दीत ३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच त्याने पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली. या दोघांनी भारताची आघाडी १०० धावापेक्षा अधिक वाढवली.
First century outside India for the Hitman! 🔥
He gets there with a monster six over long on!Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #RohitSharma pic.twitter.com/4HDSE276Ow
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 4, 2021
भारताने दुसरे सत्र संपेपर्यंत ६९ षटकात १ बाद १९९ धावा केल्या. तसेच भारताने १०० धावांची आघाडी घेतली आहे. रोहित १०३ धावांवर नाबाद आहे. तर पुजारा ४८ धावांवर खेळत आहे.
💯 for HITMAN
First away Test ton for @ImRo45 👏👏
He also breaches the 3K Test-run mark.#TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/KOxvtHQFGB
— BCCI (@BCCI) September 4, 2021
रोहित शर्मा-केएल राहुलची अर्धशतकी सलामी
तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावातील १७ व्या षटकापासून आणि ३ बाद ४३ धावसंख्येपासून पुढे खेळायला सुरुवात केली. भारताकडून दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेली रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची सलामी जोडी तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला फलंदाजीसाठी मैदानात उतरली.
या दोघांनी पहिल्या सत्राची उत्तम सुरुवात करताना अर्धशतकी भागीदारी रचली. हे दोघे खराब चेंडूंचा समाचार घेत भारताचा डाव पुढे नेत असतानाच २४ व्या षटकात केएल राहुलला इंग्लंडने केलेल्या पायचीतच्या अपीलवर मैदानावरील पंचांनी बाद घोषित केले होते. मात्र, केएल राहुलने रिव्ह्यूची मागणी केली आणि त्यात तो नाबाद असल्याचे दिसल्याने मैदानावरील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. दरम्यान रोहितलाही दोनवेळा झेल सुटल्याने जीवदान मिळाले.
यानंतर ३४ व्या षटकात मात्र, केएल राहुलविरुद्ध इंग्लंडने यशस्वी रिव्ह्यू घेतला. त्यामुळे अँडरसनविरुद्ध खेळताना राहुलला ४६ धावांवर बाद होत माघारी परतावे लागले. राहुलचा झेल यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने घेतला. केएल राहुलच्या विकेटमुळे सलामीची ८३ धावांची भागीदारीही तुटली.
राहुलनंतर चेतेश्वर पुजाराने रोहितला चांगली साथ देताना आणखी पडझड होणार नाही याची काळजी घेतली. दरम्यान, रोहितविरुद्ध ४० व्या षटकात इंग्लंडने घेतलेला रिव्ह्यू अयशस्वी ठरला. अखेर पहिल्या सत्रात इंग्लंडला भारताची दुसरी विकेट घेण्यात अपयश आले. तसेच भारताने ९९ धावांची पिछाडी भरुन काढत आघाडी मिळवली आहे.
पहिल्या सत्राखेर भारताने ४२ षटकांत १ बाद १०८ धावा केल्या.
Lunch at The Oval 🍲
The visitors take a lead of 9 runs but lose the wicket of KL Rahul. #WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFiKhzZ pic.twitter.com/joRlgotVhy
— ICC (@ICC) September 4, 2021
या सामन्यात भारताने पहिल्या डावात १९१ धावा केल्या आहेत. तर इंग्लंडने पहिल्या डावात २९० धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडने ९९ धावांची आघाडी घेतली आहे.