इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. ज्यामुळे इंग्लंडने या मालिकेत १-१ ची बरोबरी साधली. आता उर्वरित २ कसोटी सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. मात्र यापूर्वीच इंग्लंडला एक मोठा धक्का बसू शकतो. इंग्लंडचा उपकर्णधार जोस बटलरची उर्वरित कसोटी सामन्यांतून माघार घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जो रूटने अजूनही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. मात्र रूटने पुढील सामन्यात जोस बटलरच्या खेळण्यासाठी उपलब्ध असण्यावर शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे बटलर उर्वरित कसोटी सामन्यात खेळणार की नाही येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.
बटलर आता दुसऱ्यांदा बाप होणार आहे. त्यामुळे त्याला त्याच्या परिवारासोबत वेळ व्यतीत करायचे असल्याचे त्याने याआधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे बटलरच्या खेळण्यावर शंका निर्माण होत आहे.
आतापर्यंत झालेल्या तीनही कसोटी सामन्यांमध्ये बटलर खेळला आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत देखील तो खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, यादरम्यान त्याने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून आपले नाव मागे घेतले आहे. त्याच्या परिवारातील सदस्यांनी यासाठी खूप त्याग केला असल्याचे सांगत, त्याने आयपीएल २०२१मधून माघार घेतली होती.
दरम्यान, ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने भारतीय संघावर तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ७६ धावांनी दमदार विजय मिळवला. ज्यामुळे इंग्लंडच्या संघाने या मालिकेत १-१ ने बरोबरी साधत आपले आव्हान कायम ठेवले आहे. तसेच भारतीय संघाच्या या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने संघातील बदलांबाबतचे संकेत देखील दिले होते. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात देखील मोठे बदल झालेले दिसू शकतात.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना ओवलच्या मैदानावर गुरुवार पासून (२ सप्टेंबर) सुरु होणार आहे. पुढील २ सामने दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत. या २ सामन्यांच्या निकालावर या मालिकेचा विजेता ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ पुढील कसोटी सामन्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–संधी असूनही फलंदाजाला दिले जीवनदान अन् मारली मिठी, ब्रावोच्या खेळाडूवृत्तीने जिंकली लाखो मने
–भारताच्या हारकिरीस कमजोर फलंदाजी जबाबदार, दिग्गजाने चौथ्या कसोटीसाठी सुचवला ‘या’ धुरंधराचा पर्याय
–देशप्रेमापोटी मेजर ध्यानचंद यांनी नाकारली होती चक्क हिटलरची ऑफर; वाचा त्यांच्याबद्दलच्या रोमांचक गोष्टी