---Advertisement---

तिसऱ्या सामन्यात मैदानावर उतरताच मॉर्गनच्या नावे झाला मोठा विक्रम; ‘या’ इंग्लंड दिग्गजांच्या यादीत सामील

On: मंगळवार, मार्च 16, 2021 8:35 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या तिसऱ्या टी२० सामन्याला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात झाली. मालिका सध्या १-१ अशा स्थितीत आहे. या सामन्यात मैदानावर उतरताच इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा पहिला इंग्लिश खेळाडू बनला. त्याचबरोबर, त्याने दोन इंग्लिश दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले.

दिग्गजांच्या यादीत झाला सामील
इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार असलेला ओएन मॉर्गन अहमदाबादस्थित नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेसाठी उतरला, तेव्हा त्याच्याकडे १०० आंतरराष्ट्रीय टी२० खेळणारा पहिला इंग्लिश खेळाडू होण्याचा मान गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्याआधी शोएब मलिक, रोहित शर्मा व रॉस टेलर यांनीच १०० टी२० सामने खेळले आहेत.

मॉर्गन इंग्लंडकडून १०० टी२० सामने खेळणारा पहिला खेळाडू बनला. त्याचप्रकारे, इंग्लंडसाठी सर्वप्रथम १०० कसोटी सामने खेळण्याचा मान कॉलिन काऊड्री यांच्याकडे जातो. काऊड्री यांनी इंग्लंडसाठी १९५४ ते १९७५ या काळात ११४ कसोटी सामने खेळले. दुसरीकडे, इंग्लंडसाठी सर्वात पहिल्यांदा १०० वनडे सामने डेव्हिड गॉवर यांनी खेळले. त्यांनी १९७८ ते १९९१ यादरम्यान इंग्लंडचे वनडे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करताना ११४ सामने खेळले होते.

दोन देशासाठी खेळणारा मॉर्गन
आयर्लंड आणि इंग्लंडसाठी देखील खेळणारा ओएन मॉर्गन सध्या या इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार आहे. कसोटी क्रिकेट खेळणे बंद केल्यानंतर त्याच्याकडे इंग्लंडच्या टी२० व वनडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१६ टी२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. तर, २०१९ मध्ये मायदेशात झालेल्या वनडे विश्वचषकात त्याने इंग्लंडला प्रथमच विश्वचषक जिंकून दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

मॉर्गनने गाठली टी२० सामन्यांची शंभरी, ‘या’ यादीत मिळवले स्थान

भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंची टी२० कारकिर्द संपल्यात जमा

Video: १४ वर्षांपूर्वी गिब्सने सलग ६ षटकार मारत रचला होता इतिहास; आजही ‘हा’ विक्रम त्याच्याच नावावर कायम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---