आयपीएलचा १७वा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. कोलकाता आणि राजस्थान या दोन्ही संघांसाठी विजय पथावर परतण्यासाठी हा सामना महत्वाचा होता. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र मागील काही सामन्यांप्रमाणे याही सामन्यात कोलकाताची फलंदाजी ढेपाळली.
त्यामुळे निर्धारित २० षटकांत त्यांनी अवघ्या १३३ धावा उभारल्या. विशेष म्हणजे या डावात त्यांचे दोन फलंदाज रन आउट झाले. सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार ईओन मॉर्गन हे दोघेही रन आउट होऊन तंबूत परतले.
मॉर्गन विचित्र पद्धतीने झाला रन आउट
कोलकताच्या रन आउट झालेल्या फलंदाजांपैकी मॉर्गन काहीसा कमनशिबी ठरला. त्याचे झाले असे की, ११व्या षटकांत राजस्थानकडून ख्रिस मॉरिस गोलंदाजी करत होता. त्याच्या एका चेंडूवर राहुल त्रिपाठीने जोरदार स्ट्रेट ड्राईव्ह मारला.
मात्र हा चेंडू नॉन-स्ट्राईकला उभ्या असलेल्या मॉर्गनच्या बॅटला लागून थांबला. क्षणार्धात हे घडल्याने मॉर्गनला त्याची कल्पना आली नाही आणि तो धाव घेण्यासाठी निघाला. मात्र त्यावेळी चपळाईने ख्रिस मॉरिसने चेंडू उचलला आणि स्टंपला लावला. त्याच्या या चपळाईने मॉर्गनला एकही चेंडू न खेळताच माघारी परतावे लागले.
https://twitter.com/lodulalit001/status/1385973478113779713?s=20
M18: RR vs KKR – Eoin Morgan Wicket https://t.co/QiJkS2bIhR
— Swadesh Ghanekar (@SwadeshGhanekar) April 24, 2021
Eoin Morgan has been run out for a diamond duck after Rahul Tripathi smashed the ball into the England captain's bat. That is as unlucky as it gets ????#IPL2021 pic.twitter.com/dTyPr3tUmG
— Wisden India (@WisdenIndia) April 24, 2021
राजस्थानची भेदक गोलंदाजी
दरम्यान, या सामन्यात राजस्थानच्या भेदक गोलंदाजीमुळे कोलकात्याला पहिल्या डावात २० षटकांत केवळ ९ बाद १३३ धावा करता आल्या. कोलकाताने नियमित अंतराने विकेट्स गमावल्याने त्यांच्या डावाला स्थैर्य मिळूच शकले नाही. त्यांच्याकडून फक्त राहुल त्रिपाठीने ३६ धावा करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.
राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने सर्वाधिक ४ विकेट्स पटकावल्या. त्याला जयदेव उनाडकट, चेतन सकारिया आणि मुस्तफिझुर रहमान यांनी प्रत्येकी एक विकेट घेत सुयोग्य साथ दिली.






