---Advertisement---

‘हवा होता आम्हा, एक अवतार! झाला तारणहार, तेंडुलकर!’ सचिनच्या वाढदिवसानिमित्त वैभव जोशीने रचला भावस्पर्शी अभंग

On: शनिवार, एप्रिल 24, 2021 8:51 PM
---Advertisement---

क्रिकेट जगतातील सार्वकालीन महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज ४८वा वाढदिवस. मुंबईत जन्मलेल्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राने जवळपास अडीच दशके क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवले. आपल्या अद्भुत कौशल्याने त्याने मैदानावर अविस्मरणीय कामगिरी करत क्रिकेट चाहत्यांची मने तर जिंकलीच. त्याशिवाय आपल्या विनम्र स्वभावाने करोडो भारतीयांच्या मनात देखील स्थान मिळवले.

त्याचमुळे सचिनला क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सात वर्षे उलटली असली तरी त्याचे गारूड जनमानसावर आजही कायम आहे. याचा प्रत्यय आजच्याच त्याच्या वाढदिवसानिमित्त आला. त्याच्या वाढदिवशी अनेक आजी-माजी खेळाडू तसेच चाहत्यांनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने भरभरून शुभेच्छा दिल्या. मात्र यात मराठीतील प्रथितयश कवी व गीतकार वैभव जोशी याने दिलेल्या शुभेच्छांनी जणूकाही आजच्या दिवसाचा कळसाध्याय रचला.

वैभव जोशीने रचला अभंग
वैभव जोशी हा मराठीतील एक प्रसिद्ध कवी आणि गीतकार आहे. अनेक चित्रपटातील त्याच्या गीतांनी लोकप्रियता मिळवली आहे. मात्र करोडो भारतीयांप्रमाणे तो देखील सचिन तेंडुलकरचा निस्सीम चाहता आहे. म्हणूनच सचिनच्या आजच्या वाढदिवसानिमित्त त्याने अनोख्या अंदाजात सचिनला शुभेच्छा द्यायचे ठरवले. त्याने सचिनवर चक्क एक अभंग रचत या शुभेच्छा दिल्या आहेत.

या अभंगात त्याने सचिनच्या कारकिर्दीतील काही खास क्षणांचे वर्णन केले आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत ज्या गोलंदाजांना पळता भुई थोडी केली, अशांपैकी काहींचा उल्लेख वैभव जोशीने या अभंगात केला आहे. तसेच सचिनच्या निवृत्तीवेळी चाहत्यांच्या मनाची झालेली भावुक अवस्था या अभंगात ‘निरोपाचे पत्र, वाचताच ओले! पाणावले डोळे, करोडोंचे!’ अशा समर्पक शब्दांत वैभव जोशीने मांडली आहे. सचिनला आजही भारतात क्रिकेटचा देव मानले जाते. मात्र तो खेळायचा त्यावेळी अनेकजण देव पाण्यात घालून त्याच्या शतकासाठी प्रार्थना करत असत. ही गंमत देखील या अभंगात ‘देवासाठी भक्त, लावायचे कौल’, या ओळींतून त्याने मांडली आहे. तर अभंगाचा शेवट त्याने ‘हवा होता आम्हा, एक अवतार! झाला तारणहार, तेंडुलकर!’, अशा अत्यंत भावस्पर्शी ओळींनी केला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्याने हा अभंग शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CODKrdEJUXr/

विक्रमांचा बादशहा सचिन
सचिन तेंडुलकरने २०१४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र आजही त्याचे कित्येक रेकॉर्ड कोणीही मोडू शकले नाहीत. सर्वाधिक कसोटी आणि वनडे सामने खेळणारा खेळाडू, कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके, असे सचिनचे कितीतरी विक्रम आजही अबाधित आहेत. त्याच्या या विक्रमांमुळे तसेच अद्भुत फलंदाजी कौशल्यामुळे त्याला क्रिकेट जगतातील एक सार्वकालीन महान फलंदाज मानले जाते.

महत्वाच्या बातम्या:

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत होणाऱ्या आयपीएल सामन्यांविषयी आली महत्त्वाची अपडेट, वाचा सविस्तर

जिंकलस भावा! वाढदिवसाच्या दिवशी सचिनने केला खास संकल्प करत दिला स्तुत्य सामाजिक संदेश, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ : मुंबईला धूळ चारल्याने गेल आनंदी, म्हणतोय मोगॅम्बो खुश हुआ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---