इंग्लंड क्रिकेटमध्ये अलिकडच्या काळात काही मोठे बदल पाहिले गेले. बोर्डचे डायरेक्टर, प्रशिक्षक आणि कसोटी संघाचा कर्णधार देखील बदलला गेला आहे. अशात आता इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाला देखील नवीन कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडला २०१९ मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार ओएन मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माध्यामांतील वृत्तानुसार ओएन मॉर्गन (Eoin Morgan) त्याच्या खराब फॉर्म आणि फिटनेसच्या कासणास्तव आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्ती घेऊ शकतो. असे सांगितले जात आहे की, चालू आठवड्यामध्ये मॉर्गन याविषयी अधिकृत घोषणा करेल आणि इंग्लंडच्या एकदिवसीय संघाला एक नवीन नेतृत्व मिळेल. मॉर्गननंतर जोस बटलर (Jos Buttler) किंवा मोईन अली (Moeen Ali) या दोघांची नावे एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासाठी चर्चेत आहेत.
नेदरलँडविरुद्धची मालिका खेळण्यापूर्वी मॉर्गनने स्वतः अशी माहिती दिली होती की, जर त्याला या मालिकेत धावा करता आल्या नाहीत, तर तो क्रिकेट सोडेल. त्यानंतर नेदरलँडविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत मॉर्गनला एकही धाव करता आली नाही. दोन सामन्यांमध्ये मॉर्गन शून्य धावांवर बाद झाला, तर एका सामन्यात त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. याच पार्श्वभूमीवर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
मॉर्गनला २०१५ एकदिवसीय विश्वचषकानंतर इंग्लंडच्या कर्णधारपदी नियुक्त केले गेले होते. त्यावर्षी खेळल्या गेलेल्या विश्वचषकात इंग्लंड संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. बांगलादेशसारख्या संघाकडून इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु मॉर्गन कर्णधार बनल्यानंतर संघात नवीन ऊर्जा संचारल्याचे पाहिले गेले होते. मॉर्गनने संघात असे गोलंदाज घेतले, जे फलंदाजीही चांगल्या प्रकारे करू शकत असतील.
त्याच्या नेतृत्वात एकदिवसीय संघ निर्भीडपणे खेळू लागला आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेकदा मोठी धावसंख्या बनवली. संघाता फलंदाजांची भरमार असल्यामुळे इंग्लंडला हे शक्य झाले. २०१९ साली मॉर्गनच्या नेतृत्वात संघाने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. मॉर्गनच्या नेतृत्वातील संघाने एकदिवसीय सामन्यात अनेकदा ४०० पेक्षा मोठी धावसंख्या केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
उमरानला पुढच्या सामन्यात संधी मिळणार? वाचा काय म्हणाला कर्णधार पंड्या
जगात ५००० पेक्षा अधिक क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच
मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित ‘या’ कारणामुळे वागतात खडूसपणे, दिग्गजाची आहे शिकवण






