वनडे विश्वचषक 2023 मध्ये गतविजेत्या इंग्लंड संगाची अपस्था खूपच बिकट झाल्याचे दिसते. इंग्लंडने विश्वचषक स्पर्धेतीत ग्रुप स्टेजमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले असून त्यातील फक्त एक सामना त्यांना जिंतला आला. परिणामी गुणतालिकेत इंग्लंड सर्वात शेवटी म्हणजे 10व्या क्रमांकावर आहे. रविवारी (30 ऑक्टोबर) भारताविरुद्ध 100 धावांनी पराभव मिळाल्यानंतर ओयन मॉर्नग याने मोठे विधान दिले.
इंग्लंडने 2019 साली अंतिम सामन्यात निसटला विजय मिळवला होता. इंग्लंडसाठी वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हा पहिला विजय असून या मान कर्णधार म्हणून ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) यालाच मिळाला. इंग्लंडला पहिला विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मॉर्गनने निवृत्ती जाहीर केली. सध्या तो समालोचकाच्या भूमिकेत पाहायला मिळतो. रविवारी भारतीय संघाने इंग्लंडचा ज्या प्रकारे दारून पाभव केला, त्यानंतर मॉर्गनने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. मॉर्गनच्या मते इंग्लंड संघाने एवढे खराब प्रदर्शन याआधी कधीच केले नाही. तसेच संघात अस्थिरता असल्यामुळे असे प्रदर्शन पाहायला मिळत आहे, असेही मॉर्गनला वाटते.
भारतीय संघाकविरुद्ध इंग्लंड संघ अवघ्या 129 धावांवर सर्वबाद झाला आणि 100 धावांच्या अंतराने पराभूत झाला. हा पराभव इंग्लंडसाठी खूपच निराशाजनक ठरला. कारण विश्वचषक स्पर्धेत हा त्यांना मिळालेला सलग चौथा पराभव होता. सामना संपल्यानंतर इंग्लंडचा माजी दिग्गज कर्णधार मॉर्गन म्हणाला, “मी कधी अशा पद्धतीचे खराब प्रदर्शन करणारा संघ पाहिला नाहीये. संघात नक्कीच अशी काहीतरी बाब आहे, ज्यामुळे अस्थिरता तयार होत आहे. तिथे नक्कीच वेगळं काहीतरी सुरू आहे.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्सच्या नुकसानावर 229 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघ 34.5 षटकात सर्वबाद झाला. रोहित शर्मा सामनावीर ठरला. कर्णधाराने भारतासाठी 101 चेंडूत 87 धावांची खेळी केली, जेव्हा संघातील इतर फलंदाज एकापाठोपाठ एक विकेट्स गमावत होते. मोहम्मद शमी यानेही चेंडूने महत्वपूर्ण योगदान दिले. शमीने 4, तर जसप्रीत बुमराह याने 3 विकेट्स घेतल्या. (Eoin Morgan reacts to England’s poor performance in World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
शमीच्या वादळात उडाली इंग्लंडची फलंदाजी, ट्वीटरवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर
विराट शून्यावर बाद होताच इंग्लंडच्या बार्मी आर्मीने उडवली खिल्ली, भारतीय यू-ट्यूबरने केली बोलती बंद