आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी (13 जुलै) एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यापुढे होणाऱ्या सर्व आयसीसी पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धांसाठी रक्कम ही समान ठेवण्याचा निर्णय जाहीर केला गेला. या निर्णयाचे क्रिकेट जगतातून स्वागत होत आहे. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे आयोजित आयसीसीच्या वार्षिक बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.
JUST IN: Equal prize money announced for men’s and women’s teams at ICC events.
Details ????
— ICC (@ICC) July 13, 2023
आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले म्हणाले, “खेळाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे आणि मला आनंद होत आहे की, आयसीसीच्या जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेणारे पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना आता समान प्रमाणात पुरस्कृत केले जाईल. मागील काही वर्षांपासून आम्ही या निर्णयावर विचार करत होतो. वनडे विश्वचषक, टी20 विश्वचषक आणि अंडर 19 विश्वचषक स्पर्धा दरम्यान ती रक्कम एकसारखीच असेल.”
2019 पुरूष वनडे विश्वचषक विजेत्या संघाला तब्बल चार लाख अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम देण्यात आली होती. तर, 2022 महिला वनडे विश्वचषक विजेत्याला 1.32 लाख अमेरिकन डॉलर्स इतके बक्षीस मिळालेले. मागील वर्षी पुरूष टी20 विश्वचषक जिंकलेल्या इंग्लंड संघाला 1.6 लाख इतकी बक्षीस रक्कम मिळालेली. तर, यावर्षी झालेल्या महिला टी20 विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाला 1 लाख अमेरिकन डॉलर देण्यात आलेले.
आयसीसीच्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेतले गेले. यामध्ये मैदानावर केलेल्या विविध चुकांसाठी दंडांची रक्कम यावेळी ठरविण्यात आली. विविध देशातील टी20 लीगमध्ये आयोजक देशातील सात खेळाडू अंतिम 11 मध्ये असणे बंधनकारक करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषकात कशाप्रकारे आयोजन केले जाईल हे देखील, या बैठकीत निश्चित झाले.
(Equal prize money announced for men’s and women’s teams at ICC events)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात असे काही पहिल्यांदाच! शुबमन गिलच्या ‘या’ निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू हैराण
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद