सत्तरच्या दशकात भारतीय मैदानावर असो किंवा परदेशातील मैदानावर असो, सगळीकडे फक्त फिरकीपटूंचा राज असायचा. वेगवान गोलंदाज सुरुवातीचे २-३ षटक टाकायचे त्यानंतर पूर्ण सामन्यात फक्त फिरकीपटूंची दहशत असायची. याच काळात जानेवारी १९६२ ला एका दमदार फिरकीपटूने भारतीय संघात आपले पहिले पाऊल ठेवले होते.
हे गोलंदाज भारतीय क्रिकेट इतिहासाच्या स्पिन चौकडीचे सदस्य आणि आपल्या काळात सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाजी करणारे ईरापल्ली प्रसन्ना हे होते. त्याच प्रसन्ना यांचा आज (२२ मे) ८१वा वाढदिवस होता. प्रसन्ना यांनी तेव्हाच्या फिरकी चौकडीच्या मदतीने भारताला न्यूझीलंडमध्ये पहिला विजय मिळवून दिला होता. तसेच, न्यूझीलंडमध्ये एका सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करण्याचा विक्रम आजही प्रसन्ना यांच्या नावावर आहे.
प्रसन्ना यांनी २४ ते २८ जून १९७६ला ऑकलंड येथे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अफलातून गोलंदाजी करत ११ विकेट्स घेतल्या होत्या. यात त्यांनी दुसऱ्या डावात ७६ धावा देत घेतलेल्या ८ विकेट्सचा समावेश होता. त्यांचा परदेशातील मैदानावर नोंदवलेला हाच विक्रम ४६ वर्षांपासून अबाधित आहे. (Erapalli Prasanna Was The Greatest OffBreak Bowler Of His Time)
प्रसन्ना यांच्या या दमदार गोलंदाजीमुळे भारताने तो कसोटी सामना ८ विकेट्सने खिशात घातला होता. मात्र, न्यूझीलंडच्या धरतीवर भारताने जिंकलेला तो २०व्या शतकातील शेवटचा कसोटी सामना ठरला. तेव्हापासून पुढे ३३ वर्षांनंतर म्हणजेच २००९मध्ये भारताने न्यूजीलंडला त्यांच्या देशात पराभूत करत आपल्या विजयाची मुहुर्तमेढ रोवली होती. त्या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकरने १६० धावांची दमदार खेळी केली होती. शिवाय हरभजन सिंगने त्याच कसोटी मालिकेत १० विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
प्रसन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीत ४९ कसोटी सामन्यात १८९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे कित्येक दशकापर्यंत कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय फिरकीपटूचा विक्रम त्यांचा नावावर होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
पंत आणि साहामध्ये जागेसाठी टक्कर; वृद्धिमान साहा म्हणतो, “टीम इंडियाची पहिली पसंती मला…”
विराट आणि रोहितमध्ये खरोखरच वाद आहे का? स्वतः रोहितच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी दिले उत्तर