---Advertisement---

ind vs aus; टीम इंडियात सर्व काही ठीक नाही, कोच गंभीरच्या बोलण्याकडे खेळाडूंचा दुर्लक्ष?

---Advertisement---

भारतीय संघाने यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चार कसोटींमध्ये दोन सामने गमावले आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत फक्त 3 कसोटी जिंकल्या आहेत. तर 5 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता गंभीर संघासमोर असहाय्य दिसत आहे. समोर आलेले अहवाल हे स्पष्टपणे दर्शवतात की टीम इंडियामध्ये सर्व काही ठीक चालले नाही.

इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मेलबर्न कसोटीत 20.4 षटकात 7 विकेट्स गमावल्यानंतर गौतम गंभीर म्हणाला, “पुरे झाले.” याशिवाय गंभीरने कोणाचेही नाव न घेता आपल्या भाषणात ‘नैसर्गिक खेळ’च्या नावाखाली खराब खेळल्याबद्दल खेळाडूंना फटकारले आहे.

अहवालात पुढे म्हटले आहे की, मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर गंभीरने खेळाडूंना त्यांच्या पद्धतीने खेळण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. जो आता संपला आहे. आता गोष्टी पुढे कशा घ्यायच्या हे गंभीर ठरवेल. जर खेळाडूंनी सामन्यापूर्वी बनवलेल्या रणनीतीचे पालन केले नाही तर त्यांना ‘धन्यवाद’ म्हटले जाऊ शकते.


या अहवालात कर्णधार रोहित शर्माबद्दल अधिक बोलले गेले. खराब फॉर्मशी झगडत असलेला रोहित शर्मा या मालिकेतील खेळाडूंसाठी पूर्वीच्या मालिकेत होता तसा नाही, असे म्हटले जात आहे.

पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिली कसोटी टीम इंडियाने जिंकली होती. मात्र, सामन्यातील निवडीबाबत वाद झाला. गौतम गंभीरला या सामन्यात हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करायचा होता. पण हा निर्णय सर्वांच्या संमतीने झाला नाही. यानंतर आकाशदीपला गुलाबी चेंडू कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्यानेही प्रश्न उपस्थित झाले होते. ज्यामध्ये हर्षित राणा प्रभाव पाडू शकला नाही.

हेही वाचा-

IND v AUS: टीम इंडियाच्या अपेक्षांवर पाणी फेरणार? सिडनी कसोटीवर पावसाचं सावट
स्टार खेळाडू आयपीएल मेगा लिलावात न विकला गेला, आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार
IND vs AUS; फाॅर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंवर संतापले भारतीय प्रशिक्षक, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---