भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वखाली 2007 मध्ये टी20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तीन ट्रॉफी भारतीय संघाने जिंकल्या आहेत. रांचीसारख्या छोट्याशा शहरातील आलेल्या धोनीने केवळ मोठी स्वप्ने पाहिली नाहीत तर ती त्याने पूर्णही केली आहेत. माहीचे आयुष्य हे कोणासाठीही प्रेरणेपेक्षा काही कमी नाही. कोट्यावधी लोकांसाठी तो एक आदर्श आहे. कदाचित यामुळेच आता त्याच्या जीवनावरील धडा शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शिकवला जात असल्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो एका शालेय पुस्तकातील काही पानांचा फोटो आहे. त्यामध्ये एमएस धोनीच्या जीवनाबद्दलची माहिती दिसून येत आहे. या पुस्तकाच्या सातव्या धड्यामध्ये धोनीच्या जीवनाविषयी माहिती सांगितली आहे. हा धडा लहान मुलांच्या पुस्तकातील असल्याचे दिसत आहे. परंतु, ही पोस्ट खरी असल्याचा अजून कुठलाही अधिकृत पुरावा पुढे आला नाही.
https://www.instagram.com/p/CRflN6YFNr4/
त्याचबरोबर यापूर्वी धोनीच्या जीवनावर चित्रपट आणि सिरिज देखील बनलेली आहे. 2016 मध्ये दिग्दर्शक नीरज पांडे यांनी धोनीच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट बनवला होता. त्या चित्रपटाचे नाव ‘एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी’ असे होते. त्या चित्रपटांमध्ये धोनीच्या बालपणापासून ते 2011 मध्ये क्रिकेट विश्वचषक पर्यंतचा त्याचा प्रवास दाखविला आहे.
त्याचबरोबर हॉटस्टारवर देखील एक वेबसीरिज प्रकाशित झाली होती. त्याचे नाव ‘द रोर ऑफ द लायन’ असे होते. या वेब सिरीजमध्ये धोनीने इंडियन प्रीमियर लीग चेन्नई सुपर किंग्स या संघासोबत घालवलेला वेळ चित्रपटाच्या स्वरूपात दाखविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अरेरे! रोहितच्या आवडत्या शॉटनेच केला गेम, सराव सामन्यात ‘असा’ झाला दुर्दैवीपणे बाद
फलंदाजाला फसवायचंय? मग चाहरकडून शिका! दीपकने उडवल्या लंकन फलंदाजाच्या दांड्या; व्हिडिओ व्हायरल
शुबमन गिलनंतर आता भारताचा ‘हा’ खेळाडूही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून होणार बाहेर?