आशिया चषक स्पर्धेत भारताने ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकले आणि सुपर फोर फेरीत जागा पक्की केली. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या चांगले प्रदर्शन करत आहे. आशिया चषकातील पहिल्या सामन्यात भारताने पकिस्तानला मात दिली, तर दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगला पराभूत केले. कर्णधाराच्या रूपात रोहित शर्मा चमकदार कामगिरी करत असला, तरी वैयक्तिक प्रदर्शानाच्या बाबतीत त्याला चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीयेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मत हफीज याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यांवर बोलताना मोहम्मद हफीज (Mohammad Hafeez) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा एक व्हिडिओ लावला आणि म्हणाला की, “तुम्हा यामध्ये रोहितला पाहू शकता. मी त्याच्या देहबोलीविषयी बोलत आहे. तो जेव्हा नाणेफेक करण्यासाठी आला, तेव्हा थोडा थकलेला, घाबरलेला आणि थोडा कन्फ्यूज असल्यासारखा दिसत होता. बोलने सोपे असते, पण त्यावर कृती करणे कढीण असते. मला नाही वाटत की, रोहित शर्मा जास्त दिवस भारताचे नेतृत्व करताना दिसेल.”
“मी नेहमीच रोहितला एन्जॉय आणि एक्सप्रेस करताना पाहिले आहे. पण आता तो स्वतःला वेळ देत नाहीये. शक्यतो तो खूप साऱ्या गोष्टींमध्ये हरवून गेला आहे. मला त्याच्याविषयी दिलगिरी आहे. माझ्या मेत एकतर तो स्वतः निर्णय घेतला किंवा भारताचा थिंक टॅंक (संघ व्यवस्थापन) याविषयी निर्णय घेईल,” असे हफीज पुढे बोलताना म्हणाला.
https://twitter.com/MHafeez22/status/1565325895468032002?s=20&t=trtta91Qzf97wAXwSKTaLQ
दरम्यान, मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली (Virat Kohli) याने भारताच्या कर्णधारपदावरून माघार घेतली. विराटच्या या मोठ्या निर्णयानंतर रोहित शर्मा भारताचा नियमित कर्णधार नबाल. कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून रोहितने भारताला अनेक महत्वाचे सामने आणि मालिका जिंकवून दिल्या. पण यादरम्यानच्या काळात त्याचे वैयक्तिक प्रदर्शन समाधानकारक नव्हते. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळताना रोहित 12 धावा करून बाद झाला. तर हाँगकाँगविरुद्ध त्याने 21 धावांची खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेशला सळो की पळो करणाऱ्या कुसल मेंडिसचा खास ‘ऍक्शन प्लॅन’! स्वत: केलायं खुलासा
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघ गाफील! सराव सत्र रद्द करून खेळाडू करतायेत…
एक पराभव पाकिस्तानला दाखवेल घरचा रस्ता, हाँगकाँगविरुद्ध ‘या’ 11 खेळाडूंसह उतरेल आझम





