पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सिकंदर बख्तने भारतीय संघावर मोठा आरोप केला आहे. त्याने नाणेफेकीत कर्णधार रोहित शर्मावर अप्रामाणिकपणाचा आरोप केला आहे. सिकंदर बख्तच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्मा जेव्हा नाणे फेकतो तेव्हा तो मुद्दाम इतका लांब फेकतो की विरोधी संघाचा कर्णधार ते पाहू शकत नाही.
पाकिस्तानच्या माध्यमांशी बोलताना सिकंदर बख्त (Sikandar Bakht) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यावर हा मोठा आरोप केला आहे. तो म्हणाला, “जर तुम्ही नीट निरीक्षण केले तर रोहित शर्मा जेव्हा जेव्हा नाणे फेकतो तेव्हा तो विरोधी संघाच्या कर्णधारापासून दूर फेकतो. नाणेफेकीत काय येते हे समोरच्या कर्णधाराला कधीच दिसत नाही. याचाच फायदा रोहित शर्मा घेतो.”
पाकिस्तानने भारतावर अनेक आरोप केले आहेत. त्यांचा एक माजी क्रिकेटपटू हसन रझा यानेही त्याच्यावर खेळपट्टी आणि बॉल टॅम्परिंगचे आरोप केले होते. तो म्हणाला होता की, “भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू दिला जातो, जेणेकरून त्यांना त्या चेंडूतून स्विंग आणि सीम मिळवता येईल. याशिवाय त्यांच्या फलंदाजीच्या वेळी खेळपट्टीही वेगळी असते.”
भारतीय संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतके झळकावली, तर मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करत 7 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने याचा पुरेपूर फायदा घेत 397 धावासंख्या उभारली आणि न्यूझीलंड संघावर दबाव टाकला. (Ex-Pakistani cricketer big accusation against Rohit Sharma Said When Rohit throws a coin he deliberately)
म्हत्वाच्या बातम्या
Semi Final 2: पावसामुळे SAvAUS सामना रद्द झाला, तर भारतासोबत कोणता संघ खेळणार Final? लगेच घ्या जाणून
IND vs NZ Semi Final: जेव्हा सर्वांसाठी व्हिलन बनला होता शमी, बुमराहनेही लपवलेलं तोंड- Video