क्रिकेट सामन्यांमध्ये संघसहकाऱ्यांसोबत थट्टा-मस्करी करणे आता सामान्य झाले आहे. असे बरेच क्रिकेटपटू आहेत, जे सहकाऱ्यांची नक्कल काढून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाचाही समावेश आहे. रोहितचा भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात श्रेयस अय्यरच्या शतकानंतर रोहित शर्माचे सेलिब्रेशन दिसत आहे.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 4 विकेट्स गमावत 397 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून विराट कोहली (117) आणि श्रेयस अय्यर (105) यांनी शतक केले. रंजक बाब अशी की, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या शतकानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मजेशीर अंदाजात सेलिब्रेशन केले. त्याचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावले आहे. यानंतर ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा अय्यरच्या सेलिब्रेशनची नक्कल करताना दिसला. रोहितला असे करताना पाहून ड्रेसिंग रूममधील सर्व खेळाडू हसू लागले. तसेच, सोशल मीडियावरही रोहितचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. चाहते रोहितच्या या सेलिब्रेशनवर मजेदार रिऍक्शन्सही देत आहेत.
Rohit Sharma imitating Shreyas Iyer's celebration 😂💙#INDvsNZ #RohitSharma𓃵pic.twitter.com/cPKRDCXGHO
— Utsav 💔 (@utsav__45) November 16, 2023
अय्यरची कामगिरी
श्रेयस अय्यर याची बॅट या सामन्यात चांगलीच तळपत होती. अय्यर या सामन्यात सुरुवातीपासून शानदार लयीत दिसला. त्याने आपल्या खेळीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 70 चेंडूंचा सामना करताना 105 धावा केल्या. या धावा करताना त्याने 4 चौकार आणि 8 षटकारही मारले.
दुसरीकडे, रोहित शर्मा याच्या खेळीविषयी बोलायचं झालं, तर त्यानेही न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा एकदा भारताला कमाल सुरुवात करून दिली. त्याने सुरुवातीपासूनच धमाकेदार फलंदाजी करत 29 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. मात्र, रोहित आपल्या खेळीला मोठ्या धावसंख्येत बदलू शकला नाही. तो टीम साऊदीच्या चेंडूवर केन विलियम्सन याच्या हातून झेलबाद झाला. मात्र, अखेरीस भारताने सामना 70 धावांनी जिंकत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. (world cup 2023 rohit sharma funny celebration shreyas iyer century see video here)
हेही वाचा-
IND vs NZ Semi Final: जेव्हा सर्वांसाठी व्हिलन बनला होता शमी, बुमराहनेही लपवलेलं तोंड- Video
SA vs AUS Semi Final 2: रोहितसेनेशी Finalमध्ये भिडण्यासाठी कोलकात्यात रंगणार महायुद्ध, पाहा Playing XI