रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभूत केले. हा सामना भारताने 70 धावांनी जिकला. तसेच, विश्वचषक 2023 अंतिम सामना गाठला. खरं तर, भारताने हा सामना जिंकून 2019 विश्वचषकात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाचा एकप्रकारे बदलाच घेतला. या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माचे विधान चर्चेत आहे. त्याने खेळाडूंचे कौतुक केले तसेच प्रेक्षकांविषयीदेखील मोठी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला रोहित?
अंतिम सामन्याचे तिकीट मिळवताच रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मोठे विधान केले. तो म्हणाला, “मी इथे खूप क्रिकेट खेळलो आहे, तुम्ही इथे आराम करू शकत नाहीत. तुम्हाला होईल तितक्या लवकर होईल, काम पूर्ण करावे लागेल. आम्हाला माहिती होते की, आमच्यावर दबाव असेल. आम्ही मैदानावर सर्वकाही घडत असतानाही शांत होतो. या गोष्टी होणे निश्चित आहे. आनंद आहे की, आम्ही काम पूर्ण करू शकलो. जेव्हा स्कोरिंग रेट 9च्या वर असेल, तेव्हा तुम्हाला संधीचं सोनं करावं लागेल. त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आम्ही त्याचा फायदा घेतला नाही. मिचेल आणि विलियम्सनने शानदार फलंदाजी केली. आम्हाला शांत राहायचे होते.”
स्टेडिअममधील प्रेक्षकांविषयी बोलताना रोहित म्हणाला, “प्रेक्षक शांत झाले होते, हाच खेळाचा अंदाज आहे. आम्हाला माहिती होते की, आम्हाला काहीतरी करावे लागेल. आम्ही शक्य तो प्रयत्न केला आणि शमी शानदार राहिला. अव्वल 5-6 फलंदाजांनी चांगले कार्य केले. अय्यरने या स्पर्धेत जे काही केले, त्याने मी खूप खुश आहे.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला, “गिलने ज्याप्रकारे पुढे येऊन फलंदाजी केली आहे, ते शानदार होते. दुर्दैवाने त्याला परतावे लागले. विराट कोहली नेहमीप्रमाणे शानदार ठरला. त्याने विक्रमी खेळी केली आणि आपले शिखर गाठले. एकूणच फलंदाजी शानदार राहिली. हीच ती गोष्ट आहे, जिच्यासोबत आम्हाला पुढे जायचे आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आम्ही धावफलकावर फक्त 230 धावा लावल्या. ज्याप्रकारे आमच्या गोलंदाजांनी पुढे येऊन गोलंदाजी केली, त्यांनी विकेट्स घेतल्या. आज मी हे म्हणणार नाही की, कोणताही दबाव नव्हता. खेळाडू काम करत होते. आम्हाला तेच करायचे होते, जे आम्ही पहिल्या 9 सामन्यात करत आलो आहोत. वास्तवात गोष्टी चांगल्या राहिल्या.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 4 विकेट्स गमावत 397 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. या सामन्यात भारतीय संघाकडून विराट कोहली (Virat Kohli) याने 113 चेंडूत 117 धावा केल्या. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. तसेच, श्रेयस अय्यर यानेही 70 चेंडूत 105 धावा केल्या. त्याने तर 4 चौकार आणि तब्बल 8 षटकार मारले. तसेच, शुबमन गिलने नाबाद 80, रोहित शर्मा याने 47 आणि केएल राहुल याने नाबाद 39 धावा केल्या.
One 𝐅𝐢𝐧𝐚𝐥 push. 🇮🇳 pic.twitter.com/SORYqSTXG6
— Rohit Sharma (@ImRo45) November 15, 2023
या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे प्रयत्न तोकडे पडले. त्यांचा डाव 48.5 षटकात 327 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल चमकला. त्याने 119 चेंडूत 134 धावा केल्या. तसेच, कर्णधार केन विलियम्सन यानेही 69 धावांची अर्धशतकी खेळी केली. न्यूझीलंडच्या सर्वाधिक विकेट्स भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने घेतल्या. शमीने 9.5 षटकात 57 धावा खर्चून सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तसेच, उर्वरित 3 विकेट्स जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी घेतली. (captain rohit sharma big statement on team india entry in world cup 2023 final after beat new zealand in semifinal by 70 runs)
हेही वाचा-
ना विराट, ना शमी, ना श्रेयस! टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो रोहितच; पाहा कुणी केलंय भाष्य
सेमी नाही, शमी फायनल! डायरेक्ट 1975 नंतर रचला कहर विक्रम, जगात कुणीच नाही केली अशी डेरिंग