आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वानखेडे स्टेडिअम येथे पार पडला. हा सामना भारताने 70 धावांनी जिंकत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. अशात आता स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणार आहे. या सामन्यातही काट्याची टक्कर पाहायला मिळेल यात कोणतीही शंका नाही. चला तर, या सामन्याविषयी जाणून घेऊयात…
संघांची स्पर्धेतील कामगिरी
दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ भारतानंतर विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियानेही 9 सामन्यांपैकी 7 सामने खिशात घातले आहेत. मात्र, लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, ऑस्ट्रेलियाने या सामन्यातील पहिले दोन्ही सामने गमावले होते. त्यानंतर त्यांनी सलग 7 सामने नावावर केले आहेत. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी कोणता संघ दुसरा उपांत्य सामना जिंकत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवतो.
इडन गार्डन्सविषयी थोडक्यात
विश्वचषक 2023 स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना (World Cup 2023 2nd Semi Final ) कोलकाता (Kolkata) येथील इडन गार्डन्स (Eden Gardens) क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. हे मैदान खूपच लहान असून फलंदाजीसाठी खूपच चांगले आहे. अशात या मैदानावर चौकार-षटकारांची बरसात पाहायला मिळेल. यात कोणताही शंका नाही की, हा सामना मोठ्या धावसंख्येचा होईल. या सामन्यातही नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
या मैदानावरील हा विश्वचषकाचा 5वा सामना असेल. साखळी फेरीतील 4 सामन्यांपैकी 3 सामने प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. इडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर बरोबरीचा सामना पाहायला मिळतो. मात्र, सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना चांगला फायदा मिळतो. दुसऱ्या डावात इथे दव पाहायला मिळतात, जेणेकरून फलंदाजांना धावा करण्यात मदत मिळते.
Another Cricket World Cup semi-final chapter for two fabled foes 👀
More ahead of #SAvAUS 👇https://t.co/dwmWvDuaPK
— ICC (@ICC) November 15, 2023
सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग
या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. त्यापूर्वी 1.30 वाजता नाणेफेक आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल. तसेच, मोबाईलवर सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. (world cup 2023 australia vs south africa 2nd semi final match kolkata eden gardens)
संभावित प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेझ शम्सी.
ऑस्ट्रेलिया
ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), ऍडम झम्पा, जोश हेजलवूड
हेही वाचा-
‘क्राऊड शांत झालं होतं, आम्हाला वाटलं…’, सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवताच रोहितचे मोठे विधान
ना विराट, ना शमी, ना श्रेयस! टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो रोहितच; पाहा कुणी केलंय भाष्य