विश्वचषक 2023 मधील 12 वा सामना 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने मात दिली होती. या पराभवानंतर पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान याने एक वक्तव्य केलं होतं, तो म्हणाला होता की पाकिस्तान संघात कसलाही जाणीव नाही. रिजवानच्या या वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने प्रतिक्रिया दिली आहे.
बासित अली (Basit Ali) माध्यंमांशी बोलताना म्हणाला, “पाकिस्तान खूप खालच्या दर्जाचे क्रिकेट खेळत आहे आणि हे जाणीवेबद्दल बोलतात. पाच वर्षांपासुन हे लोकं खेळत आहेत आणि कारण अवेरनेसचं देतात. या पेक्षा १९ वर्षांखालील संघ विश्वचषक खेळण्यास पाठवला असता तर भारी झालं असतं. अवेरनेस कशाला म्हणतात हे अगोदर यांना विचारा. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने आधी स्वतःच्या आत डोकावून पाहावे आणि त्याच्यात किती अवेरनेस आहे हे बघावे. सर्व जग ऐकत आहे आणि तुम्ही म्हणत आहात की जाणीव नाही.”
मोहम्मद रिझवानने मोहम्मद रिजवान म्हणाला होता की, “विश्वचषकातील प्रत्येक सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही ते आव्हान म्हणून पाहतो. जिंकणे आणि हारणे सुरूच राहील. ठीक आहे, आम्ही भारताकडून पराभूत झालो. पण त्याआधी आम्ही जिंकलोही होतो. भविष्यात आपण ज्या संघांशी स्पर्धा करू, त्यामध्ये कौशल्यासोबतच अवेरनेसवर भर द्यावा लागेल. आमचा संघ पाहिला तर आमचा संघ कौशल्याने चांगला आहे. आपण संपूर्ण जगाच्या मागे आहोत असे कोणी म्हणू शकत नाही. होय, पण थोडा अवेरनेस पहावा लागेल, विशेषतः क्षेत्ररक्षणाबाबत.”
पाकिस्तान संघाचा पुढील सामना 20 ऑक्टोबरला एम चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोर येथे ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत विश्वचषक 2023 मध्ये 3 सामने खेळले आहेत. त्यातील 2 सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे. (U-19 team for World Cup former Pakistani cricketer blunt reply Mohammad Rizwan)
महत्वाच्या बातम्या –
IND vs BAN: बांगलादेशने जिंकला टॉस, टीम इंडिया विजयी ‘चौकार’ मारण्यासाठी सज्ज; पाहा Playing XI
न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करताच केला आश्चर्यकारक Record, 1975नंतरचा दुसरा जबरदस्त विजय






