वनडे विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. या सामन्यात संथ खेळपट्टीचा वापर करण्यात आला असल्याचे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता या प्रकरणी माजी भारतीय खेळाडू अंबाती रायुडू याचीही प्रतिक्रिया आली आहे, त्याचे मत आहे की, अंतिम सामन्यासारख्या मोठ्या सामन्यासाठी ही खेळपट्टी योग्य नव्हती.
अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याच्या मते अंतिम सामना संथ आणि निर्जीव खेळपट्टीवर खेळवला गेला नसावा. एका शोमध्ये बोलताना तो म्हणाला, “अंतिम सामन्यासाठी विकेट अतिशय संथ आणि निर्जीव होती. ही कल्पना कोणाची होती हे मला माहीत नाही. मला वाटते की, सामान्य खेळपट्टी चांगली असती कारण आम्ही ऑस्ट्रेलियन संघापेक्षा खूप मजबूत होतो. आम्हाला अंतिम फेरीत हे सर्व करण्याची गरज नव्हती. ही एक चांगली क्रिकेट विकेट असायला हवी होती, जी दुर्दैवाने झाली नाही.”
रायुडू पुढे म्हणाला, “2023 च्या विश्वचषक फायनलसाठी खेळपट्टी भारताच्या बाजूने तयार केली गेली असेल तर तो फार शहाणपणाचा निर्णय नव्हता. मला माहित नाही की याबद्दल कोणी विचार केला आहे किंवा ते जाणूनबुजून केले आहे. जर त्यांनी हे जाणूनबुजून केले असेल तर ते मूर्खपणाचे आहे. पण मला वाटत नाही की कोणी असे काही केले असावे.”
विशेष म्हणजे अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली आणि भारतीय फलंदाज काही विशेष चमक दाखवू शकले नाहीत. भारतीय संघाला 50 षटकात केवळ 240 धावाच करता आल्या. त्याचवेळी, लक्ष्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठे झटके लागले. परंतु त्यानंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली बनली आणि ट्रॅव्हिस हेड (Travis Head) (137) आणि मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) या जोडीने त्याचा पुरेपूर फायदा उठवत 192 धावांची भागिदारी केली. आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवला. अशाप्रकारे भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. (Ex-player’s eye-opening reaction to World Cup final pitch; Said, I don’t know whose idea it was but)
म्हत्वाच्या बातम्या
अर्रर्र! पावसामुळे रद्द होणार INDvsAUS 2nd T20I सामना? एकाच फोटोने वाढवलं टेन्शन
“सुरुवातीपासूनच वापर करा आणि फेका अशी वृत्ती”, इरफानचे ट्विट चर्चेत