लीड्स। 2019 विश्वचषकात गुरुवारी(4 जूलै) अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 42 वा सामना पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 23 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच फॅबियन ऍलेनने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर शानदार झेल घेत त्यांचा स्पर्धेचा शेवटही गोड केला आहे.
ऍलेनने या सामन्यात अफगाणिस्तानच्या सईद शिरजदचा हवेत उडी मारुन एका हाताने घेतलेल्या झेलने सर्वांनाच थक्क केले आहे.
झाले असे की या सामन्यात अफगाणिस्तानकडून शेवटच्या चेंडूवर शिरजद फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याने वेस्ट इंडीजकडून ओशन थॉमसने टाकलेल्या या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मोठा फटका मारला. पण चेंडू बॅटवर निट आला नसल्याने चेंडू वर उडाला.
यावेळी ऍलेनने मागे पळत जात डावीकडे उडी मारत एका हाताने तो चेंडू झेलला. त्यामुळे अफगाणिस्तानने शेवटच्या चेंडूवर शेवटची विकेटही गमावली.
https://twitter.com/ICC/status/1146835722009231363
या सामन्यात वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 311 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून शाय होपने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. त्याचबरोबर एव्हिन लुईसने 58 आणि निकोलस पुरननेही 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. अफगाणिस्तानकडून दवलत झादरनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतले.
त्यांनंतर 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तानकडून यष्टीरक्षक फलंदाज इक्रम अली खिल आणि रेहमत शहाने दुसऱ्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी करत चांगली झुंज दिली.
या दोघांनीही अर्धशतके केली. इक्रमने 86 तर रेहमतने 60 धावा केल्या. तसेच असगर अफगाणने 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र त्यांचे अन्य फलंदाज खास काही करु न शकल्याने अफगाणिस्तानला 50 षटकात सर्वबाद 288 धावाच करता आल्या. वेस्ट इंडीजकडून कार्लोस ब्रेथवेटने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–अफगाणिस्तानच्या १८ वर्षीय इक्रम अली खीलने मोडला सचिन तेंडुलकरचा २७ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम
–सेमीफायनल आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; हा खेळाडू विश्वचषकातून बाहेर
–विराट कोहलीने पाळला शब्द; क्रिकेट चाहत्या ८७ वर्षीय आजींसाठी केली ही खास गोष्ट






