आज महिला टी२० विश्वचषकात भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया महिला संघा विरुद्ध पहिला अंतिम सामना खेळत आहे. या विश्वचषकात भारताकडून दिप्ती शर्माने शानदार अष्टपैलू कामगिरी केली आहे. भारतीय संघाच्या याच २२ वर्षीय खेळाडूबद्दल काही मनोरंजक गोष्टी-
-दिप्तीचे पुर्ण नाव दिप्ती भगवान शर्मा असून तिचा जन्म २४ ऑगस्ट २९१४७ रोजी आग्रा, उत्तरप्रदेश येथे झाला आहे.
-आपला भाऊ सुमित शर्माकडून प्रेरणा घेत तिने क्रिकेटचा श्रीगणेशा केला होता.
-मुलांचा क्रिकेटमधील सराव पाहण्यासाठी ती वयाच्या नवव्यावर्षी भावाबरोबर मैदानावर जात असे.
-एकदिवस तिला कुणीतरी दुर गेलेला चेंडू परत देण्यासाठी सांगितले. तेव्हा तिने ५० मीटरपेक्षा जास्त दुरहून स्टंप्स उडवले होते. हे भारतीय महिला संघाच्या निवड समिती सदस्या हेमलता काला यांनी पाहिले.
-रिता देव या भारतीय महिला क्रिकेट निवड सदस्यांनी यांनी वयाच्या १५व्या वर्षी दिप्तीची कौशल्य पाहुन ती भारतीय संघात नक्की जागा मिळवेल अशी भविष्यवाणी केली होती.
-दहावीत असताना दिप्ती क्रिकेट मैदानावर परिक्षेच्या काळात अभ्यासाची पुस्तके घेऊन येत असे.
-क्रिकेटमध्ये कारकिर्द घडविण्यासाठी तिच्या परिवाराने तिला जोरदार पाठिंबा दिला होता.
-२८ नोव्हेंबर २०१४ रोजी तीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
-तर ३१ जानेवारी २०१६ रोजी तीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० पदार्पण केले.
-जून २०१८मध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीसाठी तिला जगमोहन दालमिया ट्राॅफीने सन्मानित करण्यात आले होते.
-२०१९मध्ये किया सुपर लीगमध्ये तिला वेस्टर्न स्ट्रोम संघाने करारबद्ध केले.
-तिचा आवडता क्रिकेटपटू सुरेश रैना असून मिथाली राजकडून दबावाच्या काळात कसे क्रिकेट खेळावे हे ती शिकली आहे.
-तिचा आवडता गायक अरिजीत सिंग असून तिला गाणे ऐकायला आवडतात. माधुरी दिक्षीत तिची आवडती अभिनेत्री आहे.






