---Advertisement---

“सर्फराझची नेतृत्वशैली कोहलीप्रमाणे; धोनीपेक्षा अतिशय भिन्न”, चेन्नईच्या शिलेदाराने केले विश्लेषण

On: शनिवार, जून 5, 2021 9:55 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून खेळतो. आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी तो शानदार फॉर्मात होता. आता तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ९ जूनपासून अबुधाबी येथे या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

फॅफ ड्यू प्लेसिस पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडियटर्सच्या संघाकडून खेळतो. या संघाचा कर्णधार सर्फराझ अहमद आहे. नुकतेच या दोन कर्णधारांविषयी बोलतांना फॅफने धोनी आणि सर्फराझच्या नेतृत्व शैलीतील फरक उलगडला. त्याचवेळी सर्फराझची नेतृत्वशैली भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीशी मिलती-जुळती असल्याचे विधानही त्याने केले.

‘हा’ आहे धोनी आणि सर्फराझच्या नेतृत्वातील फरक
फॅफ ड्यू प्लेसिसने विराट कोहली आणि सर्फराझच्या आक्रमक नेतृत्वशैलीची तुलना धोनीच्या शैलीशी केली. यावेळी तो म्हणाला, “अतिशय भिन्न शैली आहेत. धोनी अतिशय शांत आणि रिजर्व खेळाडू आहे. तो अनेक निर्णय मैदानावरच घेतो. आणि सर्फराझ यापेक्षा एकदम वेगळा. काहीसा विराट कोहली प्रमाणे. सतत खेळाडूंशी बोलत राहणारा, गोलंदाजांशी बोलत राहणारा. तो ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व करतो त्यात तो अतिशय जिद्दी असतो आणि हे इतरांना देखील सांगत असतो. यात कोणीही चूक किंवा बरोबर नाही. दोन्ही शैली विभिन्न प्रकारच्या आहेत.”

“वेगवेगळया कर्णधारांसह खेळणे पसंत”
यावेळी फॅफ ड्यू प्लेसिसने त्याला वेगवेगळया कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळणे पसंत असल्याचे देखील सांगितले. तो म्हणाला, “मी नेहमीच विविध कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा आनंद लुटला आहे. मला त्यावेळी हे सगळे कर्णधार कशाप्रकारे काम करतात, हे पाहायला मिळाले आहे. मी देखील नेतृत्व करण्याच्या बाबतीत अतिशय रस घेतो. त्यामुळे इतर कर्णधार कसे काम करतात, याचे निरीक्षण करणे मला फायदेशीर ठरते. त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा मी त्यांना सल्ला देखील देतो.”

फॅफ ड्यू प्लेसिसने काही काळ दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद सांभाळले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने ३६ पैकी १८ कसोटी सामने जिंकले आहेत. त्याचवेळी वनडे क्रिकेटमध्ये त्याने ७६ सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे. यात त्यांच्या संघाला ५१ विजय मिळाले असून २३ पराभव पत्करावे लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारीच! ‘फोर्ब्स’च्या यादीत ‘या’ एकमेव क्रिकेटपटूचं नाव, २२९ कोटींच्या कमाईसह ५९व्या स्थानावर

आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात फ्लॉप झालेले ‘हे’ खेळाडू यूएईमध्ये करणार धमाका!

विरोधी संघावर ‘त्याचा’ प्रभाव असा पडतो, जसा पुर्वी सेहवाग-गिलख्रिस्टचा असायचा; कार्तिकचे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---