---Advertisement---

आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात फ्लॉप झालेले ‘हे’ खेळाडू यूएईमध्ये करणार धमाका!

On: शनिवार, जून 5, 2021 8:45 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित केली गेली होती. आयपीएलचे पहिला टप्पा भारतात खेळले गेले होते. पण बायो बबलमध्ये कोरोनाच्या शिरकाव झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएलवर स्थगिती आणली होती. परंतु काही दिवसांपुर्वीच बीसीसीआयने क्रिकेट चाहत्यांना खुशखबर दिली आहे की, आयपीएलचे उर्वरित सामने म्हणजेच दुसरा टप्पा हा यूएईमध्ये खेळवण्यात येईल.

आज आपण अश्या खेळाडूंबद्दल बोलणार आहोत, ज्यांना आयपीएलच्या पहिल्या सत्रात चांगले प्रदर्शन करता आले नाही. पण त्यांनी मागील वर्षी यूएईमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. त्यामुळे हेच खेळाडू पुन्हा आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात तसेच प्रदर्शन करू शकतील. चला जाणून घेऊया कोण आहेत ते ५ खेळाडू?

१. ईशान किशन
मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन हा आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात जशी पाहिजे तशी कामगिरी नाही करू शकला. त्याने या हंगामात ५ सामन्यांमध्ये १४.६० च्या सरासरीने केवळ ७३ धावा काढल्या. सोबतच त्याला एकही सामना यष्टिरक्षण करू दिले गेले नाही.

मागील आयपीएलच्या हंगामात ईशान किशनने मुंबईला विजेतेपद मिळून देण्यासाठी मोलाचा वाटा उचलला होता. त्याने मागील आयपीएलमध्ये १४ सामन्यात ५१६ धावा करत सर्वाधिक धावा केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी होता. त्याने या हंगामात सर्वाधिक ३० षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला होता. मुंबईचा हा मुख्य खेळाडू यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्याची कमाल दाखवण्यासाठी तयार असेल.

२. शुभमन गिल
युवा सलामीवीर शुभमन गिल हा सध्या इंग्लंडला होणाऱ्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी तयारी करत आहे. गिल हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ४८ आयपीएल सामने खेळले आहेत व त्यात १०७१ धावा केल्या आहेत. पण या हंगामात त्याचे प्रदर्शन खूप फिके दिसले. त्याने ७ सामन्यात फक्त १३२ धावा केल्या आहेत.

त्याने आयपीएल २०२०च्या हंगामात ३ अर्धशतकांसोबत ४४० धावा केल्या होत्या. २०१८ मध्ये कोलकाताने त्याला आपल्या संघात सामाविष्ट केले होते. त्याने मागील हंगामात धडाकेबाज कामगिरी करत स्वत:ला सिद्धही केले होते. आयपीएलच्या येणाऱ्या टप्प्यात तो यूएईमध्ये चांगले प्रदर्शन करण्यास उत्सुक असेल.

३. युझवेंद्र चहल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा व कर्णधार विराट कोहलीचा हुकमी एक्का म्हणजेच अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल. चहलने आयपीएलच्या मागील हंगामात बंगलोरसाठी एकूण २१ विकेट घेतल्या होत्या. परंतु आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात त्याला ७ सामन्यांमध्ये फक्त ४ विकेट्स घेण्यात यश आले आहे. आता यूएईमधील उर्वरित सामन्यांत त्याला खेळवण्यात आले, तर अधिकाधिक विकेट घेण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. मागील ७ वर्षां ध्ये चहलने दर आयपीएलमध्ये १० पेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत व ३ वेळेस २० पेक्षा अधिक विकेट घेण्यात त्याला यश मिळाले आहे.

४. निकोलस पूरन
गेल्या २ वर्षांपासून वेस्ट इंडिजचा हा आक्रमक फलंदाज पंजाब किंग्सकडून खेळत आहे. ४.२ कोटींमध्ये घेतलेल्या निकोलस पूरन याने सतत आपल्या संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. परंतु या आयपीएलमध्ये निकोलस पूरनला ७ सामन्यांत फक्त २८ धावा बनवण्यात यश आले आहे. आयपीएल २०२० मध्ये पूरनने १४ सामन्यात ३५३ धावा केल्या होत्या. त्यात २३ चौकार २५ षटकार आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. यूएईमध्ये तो परत त्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करेल.

५. हार्दीक पांड्या
मुंबई इंडियन्सच्या धडाकेबाज अष्टपैलू हार्दीक पांड्या आयपीएल २०२१ मध्ये एवढा प्रभावशाली नाही दिसला. हार्दीक जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा चांगल्या चांगल्या गोलंदाजांची हवा टाईट करतो. हेच प्रदर्शन त्याने २०२० च्या यूएई आयपीएलमध्ये केले होते. परंतु या आयपीएलमध्ये त्याने ७ सामन्यात फक्त ५२ धावा केल्या आहेत. आतापर्यंत हार्दीक ८७ आयपीएल सामने खेळला आहे. त्यात त्याने १४०१ धावा व ४२ विकेट्स घेतल्या आहेत. मागील आयपीएलमध्ये त्याने २८१ धावा केल्या होत्या. त्यातील एका सामन्यात नाबाद ६८ धावांची तांबडतोड फलंदाजी केली होती. आयपीएल २०२१च्या पुढील टप्प्यात तो त्याचा उत्कृष्ट खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल.

महत्वाच्या बातम्या

जिद्द असावी तर अशी! पाकिस्तान टी२० संघात वजनदार फलंदाजाची एंट्री, वर्षभरात घटवलं ३० किलो वजन

एकाचं पोट दुखलं, दुसऱ्याची गोलंदाजी नडली; क्रिकेट इतिहासातील एकमेव षटक, ज्यात तिघांनी केली गोलंदाजी

‘कधीच विचार केला नव्हता हॉटेलमध्ये माझ्यासोबत इतके दिग्गज असतील’, २००८ आयपीएल गाजवलेल्या खेळाडूचा आठणींना उजाळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---