---Advertisement---

आयपीएलमध्ये चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडनंतर फाफ डू प्लेसिसने केला ‘तो’ खास विक्रम

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 11:46 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये बुधवारी (२८ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. सीएसकेने ७ गडी राखून सहजरित्या सामना आपल्या नावे केला. गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाड व फाफ डू प्लेसिस यांनी अर्धशतके झळकावत विजय सोपा केला. या सामन्यात डू प्लेसिसने अर्धशतक झळकावत सीएसकेसाठी एक खास कामगिरी केली.

चेन्नईचा सोपा विजय
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर व मनीष पांडे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ३ बाद १७१ धावा जमवल्या. प्रत्युत्तरात चेन्नईसाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाड व फाफ डू प्लेसिस यांनी पहिल्या गड्यासाठी १३ षटकात १२९ धावांची भागीदारी करून चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. ऋतुराजने ७५ तर, प्लेसिसने ५६ धावांची खेळी केली.

डू प्लेसिसचा नवा पराक्रम
हैदराबाद विरुद्ध ५६ धावांची खेळी करून डू प्लेसिसने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले. केकेआर विरुद्ध त्याने नाबाद ९५ धावांची खेळी केली होती. तर, मागील सामन्यात आरसीबी विरुद्धही त्याने अर्धशतक झळकावले. सीएसकेसाठी सलग तीन सामन्यात अर्धशतक ठोकणारा तो केवळ दुसरा फलंदाज बनला. तसेच, या हंगामातील ऑरेंज कॅप देखील त्याच्याकडे आली आहे.

याआधी आयपीएलमध्ये सीएसकेसाठी सलग तीन सामन्यात अर्धशतके झळकावण्याची कामगिरी सर्वप्रथम डू प्लेसिसचा सलामीचा साथीदार ऋतुराज गायकवाडने केली होती. ऋतुराजने आयपीएल २०२० च्या अखेरच्या तीन सामन्यांमध्ये आरसीबी, केकेआर आणि पंजाब किंग्स विरुद्ध खेळताना सलग तीन सामन्यात अर्धशतके पूर्ण केली होती.

डू प्लेसिसची आपीएल कारकीर्द
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार असलेल्या फाफ डू प्लेसिसने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९० सामने खेळताना ३४.७५ च्या सरासरीने २५७२ धावा बनविल्या आहेत. यामध्ये १९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने आत्तापर्यंत केवळ सीएसके व रायझिंग पुणे सुपरजायंट या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आरपी सिंगने सोडला आयपीएलचा बायोबबल, धक्कादायक कारण आले समोर

CSK vs SRH: ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईचा हैदराबादवर ७ विकेट्सने मोठा विजय

भारीच! डेव्हिड वॉर्नर टी२० क्रिकेट इतिहासात असा कारनामा करणारा जगातील चौथाच क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---