ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या त्या वादग्रस्त कसोटी सामन्याला चारच वर्ष पूर्ण झाली, मात्र हा कसोटी सामना इतिहासात कायम राहणार आहे आणि चाहते तो कधीही विसरणार नाही. यामागचे कारण म्हणजे प्रसिद्ध ‘सॅंडपेपर गेट प्रकरण’. यामुळे त्यावेळेचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना एका वर्षासाठी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निलंबित केले होते.
डेविड वॉर्नर (David Warner) याच्यावर तर कायमची नेतृत्व न करण्याची बंदी घातली गेली. तो त्या कसोटी मालिकेत उपकर्णधार होता. ती बॉल टेम्परिंगची घटना चार सामन्याच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात घडली. या मालिकेदरम्यान वॉर्नर आणि क्विंटन डी कॉक यांच्यात शाब्दिक चकमक झाली जी जवळपास मारहाणीपर्यंत पोहोचली होती.
या घटनेनंतर खूप काही बदल दिसले, मात्र त्यामुळे झालेले काही परिणाम अजूनही जाणवतात. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसी (Faf Du Plessis) होता. त्याने नुकतेच त्याचे ‘फाफ- थ्रू फायर’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. यामध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्या वादग्रस्त कसोटी मालिकेचे दोषी फाफने सॅंडपेपरचा वापर करणाऱ्या बॅनक्रॉफ्ट किंवा स्टीव स्मिथ (Steve Smith) यांना नाही मानले, तर त्याने त्यावेळच्या वॉर्नरच्या दादागिरीला कोसले.
फाफने एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना म्हटले, ” तो एक दादागिरी करणारा होता आणि माझ्याकडे अशा लोकांसाठी वेळ नाही.” त्याच्या या विधानाचा अनेकांनी योग्य तो अर्थ लावला आहे. तसेच फाफच्या बोलण्यावरून बॉल टेम्परिंगपेक्षा आणखी बरेच काही झाले असण्याची शक्यता निर्माण होते.
डरबन या पहिल्या कसोटी सामन्यावेळी वॉर्नरचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो क्विंटन डी कॉकशी हुज्जत घालताना दिसला. या मालिकेतील हा पहिला सामना होता आणि ऑस्ट्रेलियाने तो 118 धावांनी जिंकला. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत मालिका 3-1 अशी जिंकली. Faf du Plessis’ big revelation about David Warner; Said, ‘He was a bully.’
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टीव्ह स्मिथचा निवृत्ती घेण्याचा विचार? म्हणाला, ‘क्रिकेट बाकी आहे, मात्र शेवटही..’
डोळ्यांवर काळा चश्मा अन् टीमची जर्सी घालत हार्दिक-केनची ‘क्रोकोडाईल बाइक राइड’; VIDEO व्हायरल