दिल्ली। इंडियन प्रीमीयर लीगमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना हायवोल्टेज सामना समजला जातो. त्यातच शनिवारी आयपीएलच्या १४ व्या हंगामात या दोन संघातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने ४ विकेट्सने बाजी मारली. मुंबईसाठी कायरन पोलार्डचे अष्टपैलू योगदान महत्त्वाचे ठरले. मात्र, याचवेळी फाफ डू प्लेसिसने सोडलेल्या एका झेलाचीही बरीच चर्चा झाली.
फाफ डू प्लेसिसने सोडला झेल
खरंतर सुरुवातीला चेन्नईने या सामन्यावर पकड मिळवली होती. चेन्नईने दिलेल्या २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने ८१ धावांवरच ३ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर पोलार्डने वादळी खेळी केली. त्याने चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. त्यातच त्याला १८ व्या षटकात जीवदान मिळाले.
झाले असे की या षटकात चेन्नईकडून शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होता. त्यावेळी त्याने ५ वा चेंडू आखुड टप्प्याचा टाकला, ज्यावर पोलार्डने पुल शॉट खेळला. त्यावेळी फाफ डू प्लेसिस लाँग ऑनवरुन पळत आला आणि त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हातून हा झेल सुटला आणि पोलार्डला ६८ धावांवर जीवदान मिळाले. याच जीवदानाचा पुढे फायदा घेत पोलार्डने नाबाद ८७ धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला.
त्यामुळे डू प्लेसिसच्या या झेलाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अनेकांनी मत मांडले की जर तो झेल डू प्लेसिसने घेतला असता तर कदाचीत सामना चेन्नई सुपर किंग्सने जिंकला असता.
खरंतर डू प्लेसिस हा क्रिकेटमधील एक उत्तम क्षेत्ररक्षक मानला जातो. त्याने यापूर्वी अनेक कठीण झेलही अत्यंत सुरेखरित्या घेतले आहेत. विशेष म्हणजे शनिवारी त्याने पोलार्डचा झेल सोडला असला तरी त्याने हार्दिक पंड्याचा १६ धावांवर अफलातून झेल घेतला. ज्या झेलाला मुंबई आणि चेन्नई सामन्यातील सर्वोत्तम झेल म्हणूनही निवडण्यात आले. मात्र, पोलार्डचा झेल सोडल्याने डू प्लेसिस मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला.
https://twitter.com/s10shaurya/status/1388568793283055616
Wait… What just happened 😳😳😳😳😳😳😳😳
Faf you dropped the catch💔💔💔😳😳😳😳😳😳😳
— ❤️🩹 (@_Guru__Nathan) May 1, 2021
Faf dropped catch and they lost the game 🙉#CSKvsMI #IPL2021 #CSK#MI
— Rams (@JuliasMotaung) May 1, 2021
https://twitter.com/alwayssslayin/status/1388567367962152961
You have contributed a lot for this team during the victory just by loosing a single match we will not forget the past , either we win or loose we will always stay with you Champ. Waiting for you to bounce back stronger the next game 💛#FafDuPlessis • #WhistlePodu• #IPL2021 pic.twitter.com/9X7N8cY2Gj
— Faf Du Plessis Fan Club™ 🦁 (@TrendsFaf) May 1, 2021
You kidding me
Faf dropped the Catch
I can't believe this
— ♡ (@anilyousm) May 1, 2021
https://twitter.com/Lisa88714984/status/1388550712364314633
CSK lost the match when Faf dropped the catch 😏
— The Joker 🤡 (@AnanthS63242495) May 1, 2021
Did Faf really just dropped THE CATCH
NOOOOO….. WAAYYYYY…..#CSKvMI #CSK #MIvCSK #MI— Shayarcaster (@shayarcaster) May 1, 2021
असा झाला रोमांचक सामना
शनिवारी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत चेन्नईला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यानुसार चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद २१८ धावा केल्या. चेन्नईकडून मोईन अलीने ३६ चेंडूत ५८ धावा, फाफ डू प्लेसिसने २८ चेंडूत ५० धावा आणि अंबाती रायडूने २७ चेंडूत नाबाद ७२ धावांची अर्धशतकी खेळी केल्या. तसेच मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईने २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ८१ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर कायरन पोलार्डने कृणाल पंड्याला साथीला घेत ८९ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे मुंबईच्या विजयाच्या अशा पल्लवित झाल्या.
अखेर पोलार्डने ६ चौकार आणि ८ षटकारांची आतिषबाजी करत ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांच्या खेळीसह मुंबईच्या विजयावर अखेरच्या षटकात शिक्कामोर्तब केले. त्याच्याशिवाय मुंबईकडून कृणालने ३२, रोहित शर्माने ३५ आणि क्विंटन डी कॉकने ३८ धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
मानलं पोलार्ड तात्याला! मुंबईने चेन्नईला पराभवाचं पाणी पाजल्यानंतर चाहत्यांकडून भन्नाट मीम्स व्हायरल
‘मॅचविनर’ पोलार्डच्या ‘त्या’ ८ गगनभेदी षटकारांची मेजवानी, पाहा व्हिडिओ