भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी आता सर्वांना माहित झाला आहे. त्याचे चाहते जगभरात आहेत. चेन्नईला उंचीवर नेण्यात त्याचे मोठे योगदान आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf Du Plessis) धोनीबद्दल आपले मत मांडत म्हटले की, जर धोनी नसेल तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ पूर्वीसारखा मजबूत राहणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत चेन्नई संघ एकदम वेगळा होईल.
धोनीबद्दल बोलताना फाफ पुढे म्हणाला की, जेव्हा धोनी संघात नसेल तेव्हा तो आपल्या जागी एक खूप मोठे स्थान सोडून जाईल.
“एका संघात एकच कर्णधार असू शकतो. त्यामुळे तुम्हाला समजले पाहिजे की याचे काय महत्त्व असते. मी वैयक्तिकरित्या मैदानावर असताना खेळाडूंची जागा ठरवत असतो. तुम्ही सामन्याच्या दिवशी आपल्या कर्णधाराची थोडी का होईना मदत करू शकता,” असे कर्णधारांबद्दल बोलताना फाफ यावेळी म्हणाला.
“असे काही लोक आहेत, ज्यांना सर्वकाही नेहमी स्वत:च करायचे असते. त्यांच्यासारख्यांना इतर कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळणे नेहमीच कठीण असते,” असेही फाफ यावेळी म्हणाला.
कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) प्रादुर्भावामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. याबद्दल आपले मत मांडत फाफ म्हणाला की, “या जगात खेळापेक्षाही खूप गंभीर किंवा महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. त्याबद्दल मला माहित झाले आहे. परंतु आमच्यासाठी एक खेळाडू आणि एक चाहता म्हणून आयपीएल हा एक अविभाज्य घटक बनला आहे.”
“मागील १० वर्षांपासून मी प्रत्येक वर्षा आयपीएलमध्ये (IPL) सहभागी होत आलो आहे. आयपीएल आता माझ्या आयुष्याचा एक भाग बनले आहे. मला खेळायला आवडते. इतर खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव खूपच छान असतो,” असे आयपीएलबद्दल बोलताना फाफ यावेळी म्हणाला.
“आयपीएलबरोबरच जो बदल होतो तो असा की, ज्या खेळाडूंविरुद्ध तुम्ही पूर्णवेळ खेळता, त्यांच्याबरोबरच खेळण्याची संधी तुम्हाला मिळते. यादरम्यान तुम्हाला नवीन मित्रही बनवता येतात,” असेही फाफ यावेळी म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रात्री दोन वाजता त्या क्रिकेटपटूने सांगितलं, मला आहेत कोरोनाची लक्षणं
-आयपीएल झाली नाही, पण हा खेळाडू ठरला आयपीएलमधील बेस्ट कॅप्टन
-आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी या कारणासाठी मानले युवराजचे धन्यवाद