क्रिकेट खेळ म्हटला की, त्यात खेळाडूच्या तंदुरुस्तीचा विषय आलाच. सध्याचा घडीला क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात टिकून राहायचे असेल तर प्रत्येक खेळाडूला तंदुरुस्त रहावेच लागते. भारतीय खेळाडू विराट कोहलीने भारतीय संघात एक प्रथा सगळ्यांसाठी चालू केली. ती म्हणजे, खेळाडू जर तंदुरुस्त नसेल तर त्याला संघात जागा नाही. विराट कोहली स्वतःसुद्धा जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे. पण एकीकडे हल्लीच दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फाफ डू प्लेसीसने सांगितले की, एका क्रिकेटपटूसाठी ‘सिक्स पॅक ऍब्ज’ असणे गरजेचं नाही.
क्रिकेट खेळण्यासाठी सिक्स पॅक्स ऍब्ज असणे गरजेचे नाही असे विधान फाफ डू प्लेसीसने वेस्ट इंडीज दौऱ्यावर निवड झालेल्या पाकिस्तानच्या अनफिट खेळाडू आजम खानबद्दल केले आहे. आजम खान माजी पाकिस्तानी खेळाडू मोईन खानचा मुलगा आहे. आजम खान अनफिट असूनसुद्धा त्याची निवड का केली गेली? यावर लोकांनी प्रश्न उपस्थितीत केले. लोकांनी हे सुद्धा म्हटले की, तो एका माजी क्रिकेटपटूचा मुलगा असल्याने त्याची निवड करण्यात आली आहे.
पकिस्तान सुपर लीग(पीएसएल) मध्ये फाफ डू प्लेसीस ‘क्वेटा ग्लेडिएटर्स’ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. १०० किलो वजनाचा आजम खानसुद्धा याच संघाचा भाग आहे.
आपल्या या सहकाऱ्याला समर्थन देत डू प्लेसिसने अबुधाबीच्या ऑनलाईन शोमध्ये सांगितले की, ‘जेव्हा तंदुरुस्तीची चर्चा होते तेव्हा प्रत्येक खेळाडूची जबाबदारी असते की त्याने स्वत:हून त्यात बदल करावा. हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी वेगळी गोष्ट आहे. स्वतःबद्दल बोलायचे झाल्यास, वय वाढले तरी मी हा सतत विचार करत असतो की, अजून मी कसा माझ्यात सुधार करू किंवा अजून कसा मी तंदुरुस्त राहू शकतो.’
‘आजमसारख्या खेळाडूला क्रिकेटमध्ये नाव कमवण्यासाठी माझ्यासारखे दिसणे गरजेचे नाही. त्याला हळूहळू त्याच्या प्रदर्शनावर त्याच्या तंदुरुस्तीवर मेहनत करून स्वतःमध्ये बदल करावा लागेल,’ असे एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख खेळाडू डू प्लेसिसने म्हटले आहे.
२२ वर्षीय आजमने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ३६ टी-२० सामन्यात एकूण ७४३ धावा केल्या आहे. प्रत्येक ४ चेंडू नंतर तो एक चौकार मारतो असा विक्रम आहे. तो एक असा खेळाडू आहे, जो नेहमी आक्रमक आणि तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो.
महत्त्वाच्या बातम्या-
क्षमा मागूनही भज्जीवर उडाली टिकेची झुंबड, ‘त्या’ पोस्टमुळे अडकला वादाच्या भोवऱ्यात
‘या’ दिग्गजाच्या नेतृत्त्वाखाली खेळायचं आहे, SRHच्या अव्वल गोलंदाज राशिदची इच्छा
लाईव्ह सामन्यात आपल्याच संघसहकाऱ्याला धडकला जो रूट अन् झालं असं काही