---Advertisement---

कडक! एकाच सामन्याच सीएसकेच्या खेळाडूंचं शतक, द्विशतक अन् त्रिशतक, पाहा नक्की काय केलाय पराक्रम

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 8:56 PM
---Advertisement---

दुबई। शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सच्या तीन खेळाडूंसाठी खास ठरला. या सामन्यात फाफ डू प्लेसिस, रविंद्र जडेजा आणि एमएस धोनी या तीन खेळाडूंच्या नावावर विविध विक्रम नोंदवले गेले.

कर्णधार धोनीचा मोठा विक्रम
हा सामना चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीसाठी कर्णधार म्हणून ३०० वा टी२० सामना होता. असा पराक्रम करणारा तो पहिला कर्णधार आहे. यापूर्वी कोणत्याच कर्णधाराला ३०० टी२० सामन्यांत नेतृत्व करता आले नव्हते. या यादीत धोनी पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर डॅरेन सॅमी आहे. त्याने २०८ टी२० सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत. तर, विराट कोहलीने १८५ टी२० सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत. त्यापाठोपाठ १७० सामन्यांसह गौतम गंभीर आणि १५३ सामन्यांसह रोहित शर्मा आहेत.

जडेजाचं द्विशतक
चे्न्नईचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजासाठी हा २०० वा आयपीएल सामना होता. तो २०० आयपीएल सामने खेळणारा सहावा खेळाडू ठरला. यापूर्वी असा कारनामा एमएस धोनी (२२०), दिनेश कार्तिक (२१३), रोहित शर्मा (२१३), विराट कोहली (२०७) आणि सुरेश रैना (२०५) यांनी केला आहे.

फाफ डू प्लेसिससाठीही खास सामना
चेन्नईचा सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसिससाठी देखील अंतिम सामना खास ठरला. त्याचा हा आयपीएलमधील वैयक्तिक १०० वा सामना होता. आयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा तो ४७ वा खेळाडू आहे.

१० अंतिम सामने खेळणारा खेळाडू
धोनीसाठी आणखी एका कारणासाठी हा अंतिम सामना खास ठरला. धोनीचा हा १० वा आयपीएल अंतिम सामना होता. त्याने ९ अंतिम सामने चेन्नई सुपर किंग्सकडून कर्णधार म्हणून खेळले आहेत. तर, १ अंतिम सामना त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळाडू म्हणून खेळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताविरुद्धच्या ९ दिवसाआधीच पाकिस्तानला मोठा झटका; प्रशिक्षकाने सोडली संघाची साथ

कानामागून आले आणि तिखट झाले! आयपीएल २०२१ मधील असा राहिला मॉर्गनच्या कोलकाताचा प्रवास

एकदम रॉयल! ‘या’ महागड्या हॉटेलात थांबणार भारतीय संघ; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लाजवाब’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---