दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डू प्लेसिस (FAF Du Plessis) सध्या त्याच्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा हंगाम (IPL 14) गाजवला. अंतिम सामन्यात सुद्धा ५९ चेंडूत ८६ धावा करून त्याने चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) चौथे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. परंतु त्याला युएईतच झालेल्या टी२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघात निवडण्यात आले नव्हते. आता यावर डू प्लेसिसने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तो आयपीएल या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये १६ सामन्यात ४५.२१ च्या सरासरीने ६३३ धावा केल्या. सर्वाधिक धावा करणारा त्याच्याच संघातला तरुण खेळाडू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) होता, त्याने उत्कृष्ट प्रदर्शन करून ऑरेंज कॅप मिळवली होती.
दक्षिण आफ्रिका बोर्डाला फाफ डू प्लेसिसने दिलं सडेतोड उत्तर
एका पॉडकास्टमध्ये तो म्हणाला, “माझ्याकडे माझ्या फलंदाजीची चांगली आणि वाईट शैली सुद्धा आहे. याचं उदाहरण देण्यासाठी आयपीएलसारखी एक संधी मिळाली. मी लक्ष्य ठरवलं होतं की मला सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल ३ स्थानात जागा मिळवायची होती आणि मला ती मिळवता आली.”
आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करूनही त्याला टी-२० विश्वचषकासाठी (T20 World Cup) दक्षिण आफ्रिका संघात (South Africa Team) घेण्यात नव्हतं आलं. याबद्दल तो म्हणाला, “मनात नकारात्मक आवाज आला तरी सकारात्मक आवाज सुद्धा येतो. जर हंगामातील अव्वल ३ खेळाडूंमध्ये तुम्हाला जागा मिळवायची असेल, तर दबावाखालीच तुम्ही तुमचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन देऊ शकतात.”
“तुमच्यावर सगळे अवलंबून असते. दबावाखालीच तुमची खरी परीक्षा असते. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला (Cricket South Africa) मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, जर तुम्ही मला विसरलात तर मी परत तुम्हाला माझी आठवण करून द्यायला आहे,” असेही त्याने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
जिंकायचं असल्यास शमी, बुमराहसह ‘या’ वेगवान गोलंदाजाला करा संघात सामील, नेहराचा कामाचा सल्ला
कोणी टॉप तर कोणी फ्लॉप! दक्षिण आफ्रिकेत पदार्पण केलेले सात भारतीय कसोटीवीर
रहस्य उलगडले, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत भारताचे ‘हे’ २ धुरंधर करणार ओपनिंग?