---Advertisement---

कॉफी विथ करन प्रकरणानंतर असे बदलले केएल राहुलचे आयुष्य

On: मंगळवार, जून 16, 2020 7:55 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याने मान्य केलं की कॉफी विथ करन प्रकरणाच्या निलंबनातून परत आल्यानंतर त्याने आपल्या वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली होती. आपण स्वार्थी झालो असल्याचे त्याने कबूल केले. तसेच त्याने आपल्या खेळावर विचार करण्यास सुरुवात केली. तो क्रिकेटच्या मैदानावर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी उत्सुक होता.

हार्दिक पंड्याच (Hardik Pandya) नव्हे, तर राहुलची कारकीर्दही कॉफी विथ करण चॅट शोमुळे वादात अडकली होती. पंड्या आणि राहुलला ऑस्ट्रेलिया दौर्‍याच्या मध्यातून (गेल्या वर्षी जानेवारीत) परत बोलावण्यात आले होते. या दोघांनी करण जोहरच्या चॅट शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त भाष्य केलं होतं.

‘इंडिया टुडे इंस्पिरेशन’ च्या दुसर्‍या सीझनच्या पहिल्या भागामध्ये राहुलला आमंत्रित केले होतं. या दरम्यान त्याने म्हटले, की निलंबनानंतर तो भारतीय संघात लगेच परत येऊ शकला नाही. कारण त्याने केवळ वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित केले होतं.

“त्या निलंबनानंतर मला स्वार्थी व्हावं आणि स्वत: साठी खेळावसं वाटलं. आणि जेव्हा मी स्वत:वर आणि वैयक्तिक गुणांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. तेव्हा मी अयशस्वी झालो. म्हणून मी स्वत: ला सांगितले, की मला यातून बाहेर पडण्याची गरज आहे. 2019 नंतर मी वेगळ्या प्रकारे विचार करण्यास सुरवात केली. म्हणूनच मी सातत्याने चांगली कामगिरी करू शकलो,” असे राहुल म्हणाला.

2019 च्या शेवटी आणि 2020 या वर्षाच्या सुरूवातीला राहुलच्या फॉर्मकडे दुर्लक्ष करता येणार नाही. परंतु कोविड- 19 च्या संकटामुळे क्रीडा जगत ठप्प झाले आहे. पाचव्या क्रमांकावर खेळण्यापासून ते डावाची सुरुवात व संघासाठी यष्टीरक्षकापर्यंत राहुलने प्रत्येक परिस्थितीत स्वत: ला या दरम्यान सिद्ध केलं आहे.

कर्नाटकचा 28 वर्षीय फलंदाज राहुल म्हणाला, “आपली मानसिकता बदलल्यामुळे तो सातत्यपूर्ण प्रदर्शन करू शकला. आपल्या सर्वांना माहित आहे, की माझी कारकीर्द फार मोठी नाही आणि २०१९ नंतर मला कळले, की माझ्याजवळ कदाचित १२ किंवा ११ वर्षे शिल्लक आहेत. आणि मला खेळाडू आणि संघाचा सदस्य होण्यासाठी वेळ आणि शक्ती समर्पित करण्याची गरज आहे.”

“खरं तर या बदललेल्या मानसिकतेने मला मदत केली आणि माझ्यावर खूप दबाव आणला. मी संघासाठी अधिक चांगली कामगिरी करण्यावर आणि विजयी संघाचा एक भाग होण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि यामुळे खेळामध्ये फरक पडला,” असेही तो पुढे म्हणाला.

शेवटच्या न्यूझीलंड दौर्‍याच्या टी20 मालिकेत राहुलने यष्टीरक्षक फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत धावांचा पाऊस पाडला. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला होता. त्यात त्याने एकूण २२४ धावा केल्या आणि मालिकावीर पुरस्कार जिंकला. यानंतर त्याच दौर्‍याच्या वनडे मालिकेतही त्याने शतकही ठोकलं होतं.

रोहित शर्माकडून (Rohit Sharma) खूप पाठिंबा मिळाला आहे. आणि तो भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उप-कर्णधार आहे, असे सांगताना राहुल म्हणाला, “रोहितच्या चर्चेमुळे मला आश्चर्य वाटले, (की टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीरसाठी केएल राहुल ही पहिली पसंती आहे. त्यानंतर तो किंवा शिखर धवन या दोघांपैकी कोणाला निवडले पाहिजे.) मी त्याच्या फलंदाजीचा मोठा चाहता आहे आणि मी गेली काही वर्षे त्याच्याबरोबर खेळत आहे.”

राहुल म्हणाला, “तो संघातील एक अशी व्यक्ती आहे. ज्याचा माझ्यावर खूप विश्वास आहे, असे मला वाटते. मी पाहिले की बर्‍याचदा तो माझ्या बाजूने होता. आणि माझ्या बाजूने उभा राहिला. यामुळे तुमचा आत्मविश्वास बराच वाढतो.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-हा दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘जमीन घेऊन धान्य पिकवेल आणि ते गरीब कुटुंबाला वाटेल’

-तुम्ही त्याला वाईट म्हणून तुमच्यातील जळकी वृत्ती दाखवून दिली

-“खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह नसतील तर चेंडूला लाळ लावू द्या”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---