---Advertisement---

फेअरप्ले अवॉर्ड ! आयपीएल २०२० मध्ये ‘या’ संघाची फेअरप्ले अवॉर्डवर मोहोर

On: मंगळवार, नोव्हेंबर 10, 2020 11:37 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० हंगामाची मंगळवारी सांगता झाली. मुंबई इंडियन्स संघाने विजेतेपदाचा चषक उंचावत इतिहास रचला. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झालेल्या अंतिम सामन्यानंतर अनेक पुरस्कार विविध खेळाडूंना तसेच संघांना देण्यात आले. यातील संघाला दिला जाणारा महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे फेअर प्ले अवॉर्ड.

फेअर प्ले अवॉर्ड आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून दिला जातो. हा पुरस्कर त्या संघाला दिला जातो, ज्या संघाने संपूर्ण स्पर्धा खिलाडूवृत्तीने खेळली आहे. प्रत्येक संघाला त्यांच्या सामन्यानंतर प्लेअर प्लेचे गुण दिले जातात. स्पर्धेच्या शेवटी ज्या संघाचे सर्वाधिक गुण होतात त्या संघाला हा पुरस्कार मिळतो.

यंदाच्या हंगामात हा पुरस्कार मुंबई इंडियन्स संघाने मिळवला आहे. तसेच या पुरस्काराचा इतिहास पाहाता सर्वाधिकवेळा हा पुरस्कार एमएस धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने जिंकला आहे. त्यांना ६ वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. या लेखात आपण आत्तापर्यंत ज्या संघांना फ्लेअर प्ले पुरस्कार मिळाला आहे, त्यांचा आढावा घेऊ.

फेअर प्ले अवॉर्ड जिंकणारे संघ – 

२००८ – चेन्नई सुपर किंग्स

२००९ – किंग्स इलेव्हन पंजाब

२०१० – चेन्नई सुपर किंग्स

२०११ – चेन्नई सुपर किंग्स

२०१२ – राजस्थान रॉयल्स

२०१३ – चेन्नई सुपर किंग्स

२०१४ – चेन्नई सुपर किंग्स

२०१५ – चेन्नई सुपर किंग्स

२०१६ – सनरायझर्स हैदराबाद

२०१७ – गुजरात लायन्स

२०१८ – मुंबई इंडियन्स

२०१९ – सनरायझर्स हैदराबाद

२०२० – मुंबई इंडियन्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---