भारताचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) अर्जुन तेंडुलकरच्या(Arjun Tendulkar) नावावर बनावट ट्विटर प्रोफाइल चालवणाऱ्या व्यक्तीवर त्वरित कारवाई करावी अशी विनंती केली आहे.
सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले की त्याचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांचे ट्विटरवर अकाउंट नाही.
मागील काही दिवसांपासून ट्विटरवर अर्जुनच्या नावावर एक बनावट अकाउंट सुरु आहे. त्यावर काही अपमानास्पद टिप्पण्याही केल्या आहेत. त्यामुळे सचिनने स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरून या बनावट अकाउंटबद्दल सर्वांना सतर्क केले. त्याचबरोबर ट्विटर इंडियाकडेही याबद्दल तक्रार केली.
“मला हे स्पष्ट करायचे आहे की माझा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा ट्विटरवर नाहीत. @jr_tendulkar हे ट्विटर अकाऊंट बनावट आहे. तसेच हे दुर्भावनायुक्त ट्वीट पोस्ट करीत आहे. यावर ट्विटर इंडियाने लवकरात लवकर कारवाई करण्याची मी विनंती करतो,” असे सचिनने ट्विट केले आहे.
I wish to clarify that my son Arjun & daughter Sara are not on Twitter.
The account @jr_tendulkar is wrongfully impersonating Arjun and posting malicious tweets against personalities & institutions. Requesting @TwitterIndia to act on this as soon as possible.— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 27, 2019
सचिनने केलेल्या तक्रारीनंतर लगेचच अर्जूनच्या बनावट अकाउंटवर त्वरित कारवाई करण्यात आली. हे बनावट अकाउंट त्वरित निलंबित करण्यात आले आहे.
या बनावट ट्विटर अकाउंटच्या प्रोफाइलमध्ये प्रोफाइल फोटो म्हणून अर्जुन तेंडुलकरचा चेंडूबरोबरील फोटो वापरण्यात आला होता. तर लॉर्ड्स येथील अर्जुनचा फोटो कव्हर फोटो म्हणून वापरण्यात आला होता. तसेच या अकाउंटच्या बायोमध्ये ‘अधिकृत, डावकरी मध्यमगती गोलंदाज, देवाचा मुलगा’, असे लिहिले होते.

अर्जून हा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. तो डाव्याहाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. तसेच तो खालच्या फळीत डाव्याहाताने फलंदाजी करतो. त्याने आत्तापर्यंत मुंबईच्या 16 वर्षांखालील, 19 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
मुथय्या मुरलीधरनची नवी इनिंग सुरु; केला राजकारणात प्रेवश
वाचा- ???? https://t.co/gGxYk93XSe????#म #मराठी #Cricke @Mazi_Marathi @MarathiRT
— Maha Sports (@Maha_Sports) November 28, 2019
संघाबरोबर बसने न जाता ३ किलोमीटर पळत हॉटेलवर परतला स्टिव्ह स्मिथ, जाणून घ्या कारण
वाचा????https://t.co/n9bxauTW0R????#म #मराठी #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #AUSvPAK #SteveSmith— Maha Sports (@Maha_Sports) November 27, 2019





