शुक्रवारी (20 जुलै) पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानने द्विशतक साजरे केले आहे.
वनडेत द्विशतक करणारा तो जगातील एकूण सहावा तर पहिलाच पाकिस्तानचा खेळाडू ठरला आहे. त्याने या सामन्यात 154 चेंडूत नाबाद 210 धावा केल्या आहेत. यात त्याने तब्बल 24 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत.
याआधी वनडेत सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मार्टीन गप्टील आणि ख्रिस गेल या सलामीवीरांनी द्विशतके केली आहेत.
फखरच्या या द्विशतकाच्या जोरावर पाकिस्तानने त्यांची वनडेमधील सर्वोच्च धावसंख्याही उभारली आहे. पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 399 धावा केल्या आहेत.
याबरोबरच फकरने इमाम उल हक बरोबर 304 धावांची सलामीची भागिदारी रचताना वनडेत सलामीची सर्वोच्च भागिदारी करण्याचाही विश्वविक्रम रचला आहे.
सर्वात कमी चेंडूत द्विशतक करणारा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू:
वनडेत सर्वात कमी चेंडूत द्विशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये फखर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने द्विशतक करताना 148 चेंडू घेतले आहेत.
या यादीत विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आहे. गेलने 138 चेंडूत द्विशतक केले होते. तर त्याच्या पाठोपाठ भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवाग आहे.
वनडेत सर्वात कमी चेंडूत द्विशतक करणारे फलंदाज:
138 चेंडू – ख्रिस गेल
140 चेंडू – विरेंद्र सेहवाग
147 चेंडू – सचिन तेंडुलकर
148 चेंडू – फखर जमान
151 चेंडू – रोहित शर्मा (दोनदा)
152 चेंडू – मार्टीन गप्टील
156 चेंडू – रोहित शर्मा
वनडेत द्विशक करणारा चौथा आशियाई खेळाडू:
वनडेत आशियाई क्रिकेटपटूंमध्ये रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागने या आधी वनडेत द्विशतके केली आहेत त्यामुळे फखर हा वनडेत द्विशतक करणारा चौथाच आशियाई खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पाकिस्तानी सलामीवीरांची विश्वविक्रमी भागीदारी, 18 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला
–कुलदीप यादव अंतिम 11मध्ये हवाच, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचे मत
–रशिद खान म्हणतो, कृणाल आपणही हे करायला हवे