---Advertisement---

लांब केस, पिवळा चष्मा; युवराज सिंगच्या रॉकस्टार लुकवर EX गर्लफ्रेंड फिदा, ‘अशी’ दिली रिऍक्शन

On: शुक्रवार, मार्च 26, 2021 6:47 PM
---Advertisement---

नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ मध्ये भारतीय लिजेंड्स संघाने श्रीलंकन लिजेंड्स संघाला १४ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. या मालिकेत माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने भारतीय लिजेंड्स संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. या मालिकेनंतर तो आता वेगळ्या लुकमध्ये दिसून आला आहे.

मैदानात चौकार आणि षटकारांची बरसात करण्यासाठी प्रसिद्ध असलेला युवराज, मैदानाबाहेर आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असतो. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ मध्ये तो कुरळ्या केसांमध्ये दिसून आला होता. परंतु त्याने आता वेगळा लुक केला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नव्या लुकमधील फोटोज् शेअर केले, ज्यानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली होती.

https://www.instagram.com/p/CM1mn_fDthx/?utm_source=ig_web_button_share_sheet

युवराजने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने केस वाढवल्याचे दिसून येत आहेत. या फोटोवर प्रसिद्ध अभिनेत्री किम शर्माने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तिने जिपर फेसवाला ईमोजी शेअर केला आहे.

तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण याने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने प्रतिक्रीया देत ,”बॉय बादशाह…” असे लिहिले आहे. तर शिखर धवनने प्रतिक्रीया देत, “पाजी पुरे बादशाह लग रहे हो…” असे लिहिले आहे. हा हेअररकट प्रसिद्ध हेअर स्टायलिश आलीम हकीमने केला आहे.

कोण आहे किम शर्मा????

युवराजच्या पोस्टवर प्रतिक्रिया देणारी किम शर्मा प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री आहे. तसेच तिचे नाव एकेकाळी युवराज सिंगसोबत जोडले गेले होते. हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. २००३ मध्ये ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले गेले होते. तसेच २००७ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर युवराज सिंगने हेजल कीचसोबत विवाह केला.

महत्त्वाच्या बातम्या-

दे घुमा के! दुसऱ्या वनडेत रिषभ पंतचे ७ खणखणीत षटकार, पटाकावलं दुसरं स्थान

दिल्ली कॅपिटल्सला मिळणार नवा कर्णधार; ‘या’ खेळाडूचे नाव नेतृत्वासाठी आघाडीवर

रिषभ पंतबरोबर होत असलेल्या तुलनेबाबत केएल राहुलने सोडले मौन; दिले ‘असे’ सडेतोड उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---